नरेंद्र मोदींची मोठी घोषणा! 1, 2, 5, 10 अन् 20 रुपयांची नाणी करणार जारी
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या प्रतिष्ठित सप्ताह-समारंभाचे उद्घाटन करताना 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये, 10 आणि 20 रुपयांच्या नाण्यांची स्पेशल सीरीज प्रकाशीत करणार आहेत. विशेष म्हणजे ही स्पेशल सीरीजची नाणी दृष्टिहीन व्यक्तींना देखील सहज ओळखता येतील.
PMO ने जारी केलेले निवेदन,
PM 6 जून 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे वित्त मंत्रालय आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या प्रतिष्ठित सप्ताह समारंभाचे उद्घाटन करणार आहेत, PMO ने एका निवेदनात म्हटले आहे. "पंतप्रधान 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये, 10 आणि 20 रुपयांच्या नाण्यांची स्पेशल सीरीज प्रकाशीत करणार आहेत," असे त्यात म्हटले आहे.
ही नाणी अशी असतील,
स्पेशल सीरीज अंतर्गत या नाण्यांवर AKAM चा लोगो असणार आहे. पीएमओच्या निवेदनात म्हटले की, "नाण्यांच्या या स्पेशल सीरीजमध्ये AKAM लोगोची थीम असेल आणि दृष्टिहीन व्यक्तींना ते सहजरित्या ओळखता येतील." हा आठवडा 6 ते 11 जून 2022 या कालावधीत 'आझादी का अमृत महोत्सव' (AKAM) चा भाग म्हणून साजरा करण्यात येत आहे.नाण्यांच्या स्पेशल सीरीज व्यतिरिक्त, पंतप्रधान क्रेडिट-लिंक्ड सरकारी योजनांसाठी राष्ट्रीय पोर्टल - जन समर्थ पोर्टल, सरकारी क्रेडिट योजनांना जोडणारे एक-स्टॉप डिजिटल पोर्टल देखील लॉन्च करणार आहेत. जन समर्थ पोर्टल हे अशा प्रकारचे पहिले व्यासपीठ आहे जे लाभार्थ्यांना थेट कर्जदारांशी जोडून ठेवण्याचे काम करणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.