Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Twitter वापरण्यासाठी तुम्हाला द्यावे लागणार पैसे, एलन मस्कने ट्विट करून दिली माहिती

Twitter वापरण्यासाठी तुम्हाला द्यावे लागणार पैसे, एलन मस्कने ट्विट करून दिली माहिती


गेल्या आठवड्यात ट्विटर विकत घेतल्यानंतर, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि ट्विटर कंपनीचे मालक एलन मस्क पुन्हा एकदा चर्चेत आहे. यावेळी चर्चेचा विषय असा आहे की तो त्याच्या वापरकर्त्यांशी संबंधित आहे.

होय, एलोन मस्कने स्वत: एक घोषणा केली. भविष्यात ट्विटर वापरण्यासाठी वापरकर्त्यांना शुल्क द्यावे लागेल असे एलन मस्क यांनी ट्विट करून सांगितले आहे. मात्र त्यांनी हे देखील स्पष्ट केले आहे की ते नेहमीप्रमाणेच त्याच्या प्रासंगिक वापरकर्त्यांसाठी विनामूल्य राहील.

 एलन मस्क काय म्हणाले

एलन मस्क यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "ट्विटर नेहमीच कॅज्युअल वापरकर्त्यांसाठी विनामूल्य असेल. परंतु व्यावसायिक आणि सरकारी वापरकर्त्यांना यासाठी थोडी किंमत मोजावी लागू शकते."

Elon Musk ट्विटरला बनवणार Free Speech प्लॅटफॉर्म!

Twitter वर बरेच काही बदलू शकते

ट्विटर विकत घेतल्यानंतर एलन मस्क त्यांचे व्यवस्थापन पूर्णपणे बदलू शकतात. ट्विटरचे सध्याचे सीईओ पराग अग्रवाल आणि पॉलिसी हेड विजया गडदे यांना ते बाहेरचा रस्ता दाखवू शकतात, अशी चर्चा जोरात सुरू आहे. एलन मस्कला कंपनीमध्ये अनेक मोठे बदल करायचे आहेत, असे अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये समोर आले आहे. पराग अग्रवाल आणि विजया गडदे यांना हटवले जाणार अशा चर्चा असल्या तरी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

Elon Musk आणि Twitterमध्ये झालेल्या डीलमुळे शेअरहोल्डर्स झाले श्रीमंत

गेल्या आठवड्यात झाली मोठी डील

एलन मस्क हे अनेक दिवसांपासून ट्विटर विकत घेण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्यांचा मुद्दा समोर येत नव्हता. बर्‍याच संघर्षानंतर 25 एप्रिल रोजी एलन मस्क आणि ट्विटर यांच्यात करार झाला आणि टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी ही मायक्रो-ब्लॉगिंग साइट विकत घेतली. त्याने 44 अब्ज डॉलर्समध्ये ट्विटर विकत घेतले. या डीलनंतर ट्विटरमध्ये बरेच काही बदलू हाऊ शकते अशी चर्चा होती. आणि आता त्यांचे एक एक निर्णय समोर येत आहे.त्यामुळे भविष्यातही कंपनी अनेक नवीन पॉलिसी आणू शकते. 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.