Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शिष्यवृत्ती, फ्रीशिप, RSMS, निर्वाह भत्ता नुतनीकरण व नवीन अर्ज करण्यासाठी 31 मे पर्यंत मुदतवाढ - सहायक आयुक्त जयंत चाचरकर

शिष्यवृत्ती, फ्रीशिप, RSMS, निर्वाह भत्ता नुतनीकरण व नवीन अर्ज करण्यासाठी 31 मे पर्यंत मुदतवाढ  - सहायक आयुक्त जयंत चाचरकर


सांगली दि. 9  :
जिल्हयातील मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीधारक अनुदानित, विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित विदयालय, महाविदयालयात शिक्षण घेत असलेल्या विदयार्थ्यानी शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये अनुसुचित जाती, विजाभज विमाप्र व इमाव प्रवर्गातील नवीन व नुतनीकरण व सन 2020-21 या शैक्षणिक वर्षातील प्रलंबित नुतनीकरण अर्जदारांसाठी शिष्यवृत्ती, फ्रीशिप, RSMS, निर्वाह भत्ता या योजनेतून अर्ज करण्यासाठी महाडिबीटी प्रणालीवर प्रक्रिया सुरू करणेत आली असून अर्ज करण्यासाठी 31 मे 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त विदयार्थ्यांनी www.mahadbtmahait.gov.in या  संकेत स्थळावरुन अर्ज करावेत असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त  जयंत चाचरकर यांनी केले आहे.

पालकांनी आपल्या पाल्याचा शिष्यवृत्तीचा अर्ज भरल्याबाबत आपल्या नजीकच्या महाविदयालयात संपर्क साधुन सन 2020-21 या वर्षातील अर्ज नुतनीकरण व सन 2021-22 मधील अर्ज नोंदणीकृत  झाले किंवा नाही याची पडताळणी करावी किंवा नजीकच्या सेंटरमध्ये जावुन अर्ज नोंदणीकृत झाली असल्याची खात्री करावी. महाविदयालय नोंदणीकृत नसेल व ते अर्ज भरुन घेत नसल्यास त्याबाबत या कार्यालयाकडे तात्काळ तक्रार करावी. भविष्यात अर्ज नोंदणीकृत नसल्यामुळे विद्यार्थ्यांस शिष्यवृत्ती मिळाली नसल्यास सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय जबाबदार असणार नाही असेही कळविले आहे. 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.