Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्रातील 'या' सहकारी बँकेवर RBI कडून कारवाई, ग्राहाकांना पैसे काढण्यास मनाई

 महाराष्ट्रातील 'या' सहकारी बँकेवर RBI कडून कारवाई, ग्राहाकांना पैसे काढण्यास मनाई


रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेवर कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार, आता ग्राहकांना बँकेतून पैसे काढण्यासही मनाई केली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मागील काही वर्षांपासून बँक आर्थिक संकटाला सामोरे जात होती. कोल्हापूरमधील शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँक लिमिटेडवर हे निर्बंध लागू केले आहेत.

या बँकेतील 99.88 टक्के खातेधारक हे Deposit Insurance and Credit Guarantee Corporation विमा योजनेतंर्गत येतात. या योजनेनुसार, खातेदारांना 5 लाख रुपयांच्या विम्याचे कवच मिळते. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार 13 मे 2022 पासून बँकेवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हे निर्बंध सहा महिन्यापर्यंत लागू असणार आहे. त्याशिवाय, बँकेच्या कामकाजावरही रिझर्व्ह बँक देखरेख ठेवणार आहे. रिझर्व्ह बँकेने म्हटले की, बँकेत लिक्विडीटी ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता बँकेतून पैसे काढण्यावर ग्राहकांना मनाई करण्यात आली आहे.

ही कारवाई म्हणजे बँक बंद होणार आहे, असे बिलकुल समजू नये असेही रिझर्व्ह बँकेने म्हटले. या सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात आली नाही. त्याशिवाय, कोणत्याही प्रकारच्या कर्जाचे नुतनीकरण करण्यासाठी रिझर्व्ह बँकेची परवानगी घ्यावी लागणार आहे.

DICGC म्हणजे काय?

Deposit Insurance and Credit Guarantee Corporation नुसार बँक जमा असलेल्या रक्कमेवर ग्राहकांना विमा सुरक्षा मिळते. हे विमा संरक्षण अधिकाधिक 5 लाख रुपयांपर्यंत मिळते. या विम्यामुळे बँक बुडाली तरी ग्राहकांना कमाल 5 लाख रुपये मिळू शकतील.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.