IPS कृष्णप्रकाश यांची संपत्ती आली समोर...
पुणे : पिंपरी चिंचवडचे माजी पोलीस आयुक्त आयपीएस कृष्णप्रकाश वादात अडकले आहेत. त्यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आलेत. कृष्णप्रकाश यांची काही दिवसांपूर्वीच पुण्यातून बदली करण्यात आली. त्यानंतर त्यांनी बदली रद्द करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याच्या देखील चर्चा होत्या.
आता राष्ट्रवादीचे आमदार आण्णा बनसोडे यांनी कृष्णप्रकाश यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यामुळं राज्य पोलीस विभागात परत एकदा खळबळ माजली आहे. अशात कृष्णप्रकाश यांच्या संपत्तीबाबत माहिती समोर आली आहे
झारखंडचे असणारे कृष्णप्रकाश हे हजारीबाग येथील रहीवासी आहेत. त्या ठिकाणी त्यांच्याकडं एकुण शेकडो एकर जमीन आहे. त्यांच्या आई-वडीलांच्या नावे ही जमीन आहे. महाराष्ट्रात सेवेत असणारे कृष्णप्रकाश यांनी राज्यात अनेक ठिकाणी मालमत्ता घेतली आहे. मुंबई, औरंगाबाद, पुणे, पिंपरी चिंचवड, अहमदनगर, देहूगाव, बाणेर, कुपवाड या ठिकाणी त्यांची जमीन आणि प्लाॅट्स आहेत. तसेच ही संपत्ती छुपी नसून राज्य सरकारकडे जाहीर केली असल्याचं कृष्णप्रकाश यांनी सांगितलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.