कोरोनाचा दुसरा Booster Dose कोणी घेऊ नये; WHO चं स्पष्टीकरण
मुंबई : कोरोनाचा धोका अजूनही संपलेला नाही. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने तज्ज्ञांचं टेन्शन वाढवलं आहे. अशातच कोरोना लसीचा चौथा डोस किंवा दुसरा बूस्टर डोसबाबत सगळीकडे चर्चा आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या म्हणण्याप्रमाणे, ज्या व्यक्तींना कोरोनाचा धोका अधिक आहे त्यांच्यासाठी दुसरा बूस्टर डोस आवश्यक आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी, 60 वर्षांवरील लोक यांचा समावेश आहे.
तरूणांना गरज नाही
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, डब्ल्यूएचओने असंही म्हटलंय की, एकूण सात अभ्यासांच्या डेटा माहिती घेतली गेली. यामधून दुसऱ्या बूस्टर डोसचा तरुणांनाही काही फायदा होईल, असा कोणताही पुरावा तज्ज्ञांच्या गटाला सापडलेला नाही.
ज्यांना कोरोनाचा धोका अधिक आहे किंवा या व्हायरसमुळे मृत्यूचा धोका ओढावण्याची शक्यता जास्त आहे अशांना mRNA लसीच्या बूस्टर डोसचा फायदा होईल, असंही सांगण्यात आलं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनेही चिंता व्यक्त केली की, काही देशांमध्ये बूस्टर डोस पोहोचणं कठीण आहे. अनेक श्रीमंत देशांनी 70 टक्के लसीकरण पूर्ण केलं आहे. त्याच वेळी, काही गरीब देश आतापर्यंत केवळ 16 टक्के लोकांचं लसीकरण होऊ शकलं आहे. डब्ल्यूएचओने यापूर्वीही तरुणांना बूस्टर डोस देणाऱ्या देशांवर टीका केली होती. तरुणांसाठी बुस्टर डोस अनावश्यक असल्याचं सांगण्यात आलंय.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.