Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अभिजित मस्के यांनी जिल्हा परिषदेचे गट नेते शरद भाऊ लाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पक्ष प्रवेश केला.

अभिजित मस्के यांनी जिल्हा परिषदेचे गट नेते शरद भाऊ लाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पक्ष प्रवेश केला.


मा. आमदार अरूण (आण्णा) लाड व जिल्हा परिषदेचे गट नेते शरद (भाऊ) लाड यांच्या नेतृत्वाखाली हणमंतवडीये (ता. कडेगाव) येथील भाजपचे कार्यकर्ते माजी ग्राम पंचायत सदस्य धनंजय कुंभार, हेमंत मोरे, मोहन मोरे, अभिजित मस्के यांनी जिल्हा परिषदेचे गट नेते शरद भाऊ लाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पक्ष प्रवेश केला.

         यावेळी कडेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश शिंगटे, माजी सभापती महेंद्र करांडे, कांती कारखान्याचे माजी संचालक रामचंद्र देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस सहकार सेलचे अध्यक्ष संभाजी पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे कडेगाव शहर अध्यक्ष वैभव देसाई,कडेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष पोपट मोरे, युवा नेते रमेश एडके प्रमुख उपस्थित होते.

          यावेळी वांगी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित संचालक आबासो शिंदे व राज्यस्तरीय बाॅक्सींग स्पर्धेत यश  संपादन करून नॅशनल निवड झाल्याबद्दल महेश अनिल कांबळे, संस्कार सुनिल चव्हाण, कौस्तुक नंदकुमार दाईगडे, ओंकार गवळी, जयंत शिंदे यांचा सत्कार जिल्हा परिषदेचे गट नेते शरद (भाऊ) लाड यांच्या करण्यात आला.

       यावेळी  विठ्ठलदेव सोसायटीचे संचालक रवींद्र पाटील, बाळासाहेब वत्रे, अजित मुलाणी, जगन्नाथ चव्हाण, शामराव हुबाले, सिकंदर मुल्ला, गणेश घाडगे, रवींद्र शिंदे, आनंदा माने यांच्यासह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.