Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा सांगली जिल्हा दौरा

 केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा सांगली जिल्हा दौरा



        सांगली दि. 4  : केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले गुरूवार, दि. 5 मे 2022 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

गुरूवार, दि. 5 मे  रोजी सायंकाळी 4.30 वाजता पंढरपूर येथून आटपाडी, जि. सांगली कडे प्रयाण. सायंकाळी 5.30 वाजता आटपाडी पोलीस स्टेशनच्या विरूध्द बाजूस डॉ. बाबासाहेब आंबेडकर बचत भवन आटपाडी जवळ आगमन. सायंकाळी 5.30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर बचत भवन जवळ निराधार मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती. रात्री 7.30 वाजता तडवळे व करगणी येथे भेट. रात्री 8 वाजता बी. आर. वस्त्र अलंकार येथे भेट. रात्री 8.15 वाजता खानापूर तालुक्यातील बेनापूर येथे दिनकर धेंडे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट. रात्री 8.30 वाजता खानापूर तालुक्यातील ‍जिल्हा परिषद शाळा क्र. 2 विटा येथील मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती. रात्री 9.30 वाजता विटा येथून पुणे कडे प्रयाण.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.