पतसंस्थांना 'गोदाम' बांधण्यासाठी परवानगी बाबत सकारात्मक निर्णय घेऊ - नाम बाळासाहेब पाटील
सांगली : सांगली किंवा नांदेड सारख्या उत्तम बाजारपेठा असो किंवा त्या त्या क्षेत्रातील परिस्थितनुसार पतसंस्थांना व्यापारी शेतकऱ्यासाठी गोदाम बांधण्यासाठी सकारात्मक निर्णय घेऊ असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांनी दि. सांगली ट्रेडर्स क्रेडिट सोसायटी सांगली आयोजित व्यापार-उदीम शिरोमणी पुरस्कार 2022 च्या जीवनगौरव सोहळ्याप्रसंगी सांगली येथील राजमती भवन येथे केले.
सांगली नगरीचे नाव व्यापार उद्योग क्षेत्रात संपूर्ण देशामध्ये दुमदुमत ठेवलेल्या सांगलीतील अडत व्यापारी यांच्या प्रथम जीवन गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अडत व्यापारी शिरोमणी पुरस्काराने सनतकुमार आरवाडे, आण्णासाहेब पाटील, शामराव आरवाडे तर हळद व्यापार शिरोमणी पुरस्कार बंकटलालजी मालू व मिरची व्यापार शिरोमणी पुरस्कार विरुपाक्ष पट्टणशेट्टी यांना देण्यात आला या जीवन गौरव सोहळ्याच्या औचित्याने उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत व शुभहस्ते दि. सांगली ट्रेडर्स को ऑप क्रेडिट सोसायटीच्या वतीने ग्राहकांना देण्यात येणाऱ्या नवीन डिजिटल बँकिंग प्रणाली सुविधांचा उदघाटन सोहळा संपन्न संपन्न झाला. तसेच क्यूआर कोड सर्व्हिस, एनईएफटी/आरटीजीएस सर्व्हिस, मोबाईल बँकिंग सव्हिंस, ज्येष्ठ नागरिकांसाठी एटीएम तुमच्या दारी, मोबाईल पिग्मी कलेक्शन या सेवा सुविधांचा शुभारंभ करण्यात आला.
या प्रसंगी बोलताना नाम, बाळासाहेब पाटील म्हणाले, सांगली मधून हळद, गूळ, मिरची, ऊस यांचा मोठ्या प्रमाणावर व्यापार होत आहे. काळाप्रमाणे पतसंस्थांमध्ये बदल करणे आवश्यक असून ते सांगली ट्रेडर्स क्रेडिट सोसायटी सांगली ने आज डिजिटल बँकिंग प्रणालीच्या माध्यमातून त्याची सुरुवात केली आहे. राज्यांमध्ये सहकाराचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले असून, देशांमधील सहकार क्षेत्रातील 60 टक्के कार्य महाराष्ट्राचे आहे. सुरुवातीला विकास सोसायटी, जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक प्रगतीची सुरुवात झाली. कच्चामाल तयार करण्यासाठी सोसायटीच्या माध्यमातून कर्जपुरवठा केला जाऊ लागला. अर्बन बँका राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्या असल्या तरी व्यापारी, शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या गरजा पूर्ण करू शकत नाहीत. त्यामुळे पतसंस्था चळवळ वाढीस लागत आहे. काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटप झालेने काही मोजक्या पतसंस्थांच्या चुकीच्या निर्णयाचा फटका चांगला पतसंस्थांना बसत आहे.
महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष काका कोयटे यांनी असे अॅसेटस रीकन्स्ट्रक्शन कंपनीच्या धर्तीवर पतसंस्थांची थकीत कर्जे हस्तांतर करण्याची प्रक्रिया राबवणे तसेच पतसंस्थांच्या विविध मागण्यांबाबत मंत्रिमहोदयांना त्या सोडविन्याबाबत विनंती केली.
यावेळी आपल्या प्रास्ताविकामध्ये दि. सांगली ट्रेडर्स क्रेडिट सोसायटीचे संस्थापक चेअरमन सुरेश पाटील यांनी पतसंस्थांना वेअर हाऊस, कोल्डस्टोरेज बांधण्यासाठी परवानगी द्यावी. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा माल सुरक्षित ठेवला जाऊन व्यापाऱ्यांना त्याचा उपयोग होईल व पतसंस्थाना त्यामध्ये ठेवलेल्या माला वर कर्ज देण्यास उपयोग होईल. पतसंस्थांच्या ठेवीदारांना ठेविला संरक्षण मिळावे यासाठी तातडीने लक्ष घालून त्याबाबत निर्णय घ्यावा. तसेच नाबार्डच्या ज्या फायनान्सच्या योजना असतात त्या योजना पतसंस्थांना देखील लागू कराव्यात त्यामुळे शेवटच्या घटकापर्यंत याचा उपयोग होईल. अशी विनंती केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.