Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तानंग तालुका मिरज येथील सर्व सेवा सहकारी सोसायटीच्या झालेल्या बिनविरोध निवडणुकीत..

तानंग तालुका मिरज येथील सर्व सेवा सहकारी सोसायटीच्या झालेल्या बिनविरोध निवडणुकीत...


तानंग तालुका मिरज येथील सर्व सेवा सहकारी सोसायटीच्या झालेल्या बिनविरोध निवडणुकीत चेअरमनपदी पंडितराव नामदेव पवार यांची तर रेवन जी सूकुमार चौगुले यांची व्हाईस  चेअरमनपदी निवड करण्यात आली गावातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी एक मताने निवड केली असल्याचे मत यावेळी उपसरपंच दीपक पाटील अप्पा यांनी व्यक्त केले.

तानंग येथील सोसायटीची निवडणूक चुरशीची होईल असा अंदाज परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केले होते. पण गावच्या विकासासाठी आणि निवडणुकीच्या खर्चाची बचत होऊन सोसायटी नफ्यात राहील ह्या उद्देशाने उपसरपंच दिपक पाटील ,ग्रामपंचायत सदस्य विकास कदम ,महादेव पाटील ,शिवाजी पाटील ,सरपंच सुनील पोद्दार यांनी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले ,व त्यांना सभासदांनी सहमती दर्शवली .यामध्ये चेअरमन पदी पंडित नामदेव पवार व्हाईस चेअरमन पदी रेवणाजी सूकुमार चौगुले ,तर संचालक रघुनाथ कृष्णा पाटील ,विजय आप्पा शिंदे ,रविंद्र जगन्नाथ राजमाने ,भानुदास महादेव जाधव ,जनार्दन बाजीराव पाटील ,भारत दिनकर पाटील, कल्पना राजाराम कदम , मंदाताई बाळासाहेब सूर्यवंशी, निलेश रामचंद्र पोद्दार, सुनील शामराव जमदाडे ,आणि शंकर यशवंत नारुटे ,असे हे संचालक मंडळ बिनविरोध निवड झालेले आहे. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून सुरेश बी चव्हाण ,आणि सचिव बाबुराव माने ,यांनी शांततेने चेअरमनपदाची निवडणूक पार पडली निवडीनंतर ग्रामस्थांच्यावतीने नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ,धनंजय पाटील यांनी केले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.