म्हैसाळ गर्भपात प्रकरणाची पालकमंत्र्यांना माहिती देताना मयत मुलीचे वडील सुनील जाधव....
म्हैसाळ गर्भपात प्रकरणातील डॉक्टर खिद्रापूर यांच्या अघोरी उपचारांने मयत झालेल्या मुलीच्या आई-वडिलांनी नामदार जयंत पाटील यांची भेट घेऊन गेले पाच वर्षात केस चालू नाही, अद्याप सरकारी वकील दिला नाही, आरोपी मोकाट आहेत असे सांगून निवेदन दिले.त्यावर नामदार जयंत पाटील यांनी अजून त्यांना शिक्षा झाली नाही का? आतापर्यंत मला का सांगीतल नाही असे म्हणत आश्चर्य व्यक्त केले. जयंत पाटलांच्या यांच्या भेटीने मात्र निवेदन देत आरोपींना नक्की शिक्षा होईल,केस मार्गी लागेल असे मुलीचे वडील सुनील जाधव यांनी सांगितले.
मार्च 2017 मध्ये म्हैसाळ तालुका मिरज येथील खिद्रापूरे डॉक्टरांच्या अघोरी उपचाराने खंडेराजुरी येथील ही तरुणी मयत झाली होती. त्यानंतर गर्भपात प्रकरणाचा उलगडा झाला होता या गर्भपात प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला होता.
याबाबत खंडेराजुरी येथील सुनील जाधव यांची मुलगी स्वाती जमदाडे (सासर मणेराजुरी ) हिचा इच्छेविरुद्ध गर्भलिंग तपासणी करून गर्भपात करताना मैसाळ येथे खिद्रापूरे दवाखान्यात मृत्यू झाला होता. तिच्या आईवडिलांनी तात्काळ पोलिसात धाव घेत डॉक्टर ,जावई सह अन्य आरोपीवर गुन्हा दाखल केला होता . या गर्भलिंग कर्नाटक सहभागी असणाऱ्या तब्बल 13 जणांना पोलिसांनी अटक केली होती. याबाबत मुख्यमंत्री, महिला आयोग, गृहमंत्री,ना. विश्वजीत कदम, उच्च न्यायालय ,जिल्हा पोलीस प्रशासनाला ही निवेदन दिले आहे.
नातेवाईक पालकमंत्र्यांना सांगत होते . त्यावेळी तात्कालीन मंत्री, अधिकाऱ्यानी आम्हाला ही केस फास्ट ट्रॅक मध्ये चालवून आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देऊ असे सांगितले होते. त्या वेळी मुलीच्या आई वडील व नातेवाईकानी प्रशासन व अधिकार्यावर विश्वास ठेवून सरकारी वकील नेमला असेल ,केस चालू असेल असे समजून भाबडेपणाने माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांना माहिती दाखल धक्काच बसला. असे ना. पाटील यांना सांगितले.
तो क्रूरकर्मा खिद्रापूरे डॉक्टर पुन्हा म्हैसाळ येथेच दवाखाना चालू केला असून सर्व आरोपी बाहेर असुन शासन आम्हाला कोणतीही शिक्षा करणार नाही असे सर्वांना सांगत आहेत अशी मुलीचे वडील सुनील जाधव यांनी सांगितले तर या केस मध्ये शासनाने अद्याप वकीलच दिला नाही त्यामुळे केस बोर्डावरच नाही तर शिक्षा तर लांबच अशी धक्कादायक माहिती कळली असल्याचे पालकमंत्री नामदार जयंत पाटील यांना नातेवाईकानी सांगितले. त्याबाबत निवेदनही दिले.
त्यावर नामदार जयंत पाटील यांनी अजून त्या आरोपींना शिक्षा झाली नाही का? असे आश्चर्याने विचारले? इतके वर्ष मला का सांगितलं नाही? मी तात्काळ लक्ष देतो आणि याची माहिती घेऊन न्याय देण्याचा प्रयत्न करतो तुम्ही भिऊ नका असे नातेवाईकांना सांगितले. त्यावेळी मुलीचे वडील सुनील जाधव ,सौ.विजया जाधव, सुधाकर जाधव, नगरसेवक विष्णू माने, हरीदास पाटील , रवीकुमार हजारे,बाळासाहेब होनमोरे उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.