मुख्यमंत्र्यांचे हस्ते दिनांक १५ मे रोजी कर्मवीर पतसंस्थेच्या मुख्यालयाचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब पाटील यांची माहिती
सांगली : कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सांगली ने कोल्हापूर रोड येथे बांधलेल्या आधुनिक प्रशस्त मुख्य कार्यालयाचे उद्घाटन रविवार दिनांक १५ मे २०२२ रोजी सकाळी ९-३० वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. नामदार उध्दवजी ठाकरे यांचे शुभहस्ते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. नामदार अजितदादा पवार यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणार असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संस्थेचा व्याप वाढत असल्यामुळे सध्याचे मुख्यालय अपुरे पडत होते त्यामुळे संस्थेला प्रशस्त मुख्य कार्यालयाची निकड भासत होती. त्यावर संचालक मंडळाने वार्षिक सभेत निर्णय घेवून संस्थेचे आधुनिक मुख्यालय बांधण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार कोल्हापूर रोड सांगली येथे २८००० चौ. फुटाचे आधुनिक सेवा सुविधांनी युक्त व कर्मवीर दालन शाखा कार्यालय, मुख्य कार्यालय मिटींग हॉल, मिटींग केबीन्स, संगणक कक्ष, २०० व्यक्ती क्षमतेचा आधुनिक मिटींग हॉल अशा विविध दालनानी सज्ज महाराष्ट्रातील पतसंस्था क्षेत्रात आदर्श ठरावे असे मुख्यालय बांधुन तयार झाले आहे. त्याचा लोकार्पण सोहळा मोठ्या दिमाखात साजरा होणार आहे.
या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणुन जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील, महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात, पर्यटन व पर्यावरण मंत्री ना. आदित्य ठाकरे. नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे, सहकार मंत्री ना. बाळासाहेब पाटील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ सार्वजनिक आरोग्य कुटूंब कल्याण राज्यमंत्री ना. राजेंद्र पाटील यड्रावकर, सहकार, कृषी, सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. डॉ. विश्वजीत कदम गृह (शहर) राज्यमंत्री ना. सतेज उर्फ बंटी पाटील, गृह (ग्रामीण) वित्त नियोजन, राज्य उत्पादन शुल्क राज्यमंत्री ना. शंभुराजे देसाई माजी खासदार संजयकाका पाटील दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष मा. रावसाहेबदादा पाटील, माजी खासदार राजू शेट्टी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. अनिल आप्पासाहेब पाटील, मा. आमदार प्रकाशआण्णा आवाडे, मा. आमदार सुधीरदादा गाडगीळ, मा. आमदार सुरेशभाऊ खाडे, मा. आमदार अरुण आण्णा लाड, सां. मि. कु. चे महापौर मा. दिग्वीजय सूर्यवंशी, माजी आमदार प्रा. शरद पाटील, गुलाबराव पाटील ट्रस्ट चे अध्यक्ष मा. पृथ्वीराज गुलाबराव पाटील या मान्यवर मंडळीना या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित राहणार आहेत. यावेळी संस्थेच्या व्हा. चेअरमन श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे, संचालक अॅड. एस.पी. मगदूम, डॉ. नरेंद्र आनंदा खाडे, डॉ. रमेश वसंतराव ढबू श्री. लालासाहेब भाऊसाहेब थोटे, श्री. ओ. के. चौगुले (नाना). श्री. वसंतराव धुळाप्पाण्णा नवले, संचालिका सौ. ललिता अशौक सकळे, तज्ञ संचालक डॉ. एस. बी. पाटील (मोटके) मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल श्रीपाल मगदूम उपस्थित होते.
हा कार्यक्रम संस्थेचे नुतन मुख्यालय, कोल्हापूर रोड, सांगली च्या प्रांगणात रविवार दिनांक १५ मे २०२२ रोजी सकाळी ९-३० वाजता मोठया उत्साहाने संपन्न होणार असून या कार्यक्रमास हे निमंत्रण समजून संस्थेचे सर्व सभासद ठेवीदार कर्जदार हितचिंत्तक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब पाटील यांनी केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.