Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांचा सांगली जिल्हा दौरा

महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांचा सांगली जिल्हा दौरा


सांगली दि. 19  :‍ महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस हे शुक्रवार, दि. 20 मे 2022 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार, दि. 20 मे रोजी सकाळी 11.30 वाजता जुहू हेलिपॅड येथून हेलिकॉप्टरने कवलापूर, ता. मिरज, जि. सांगलीकडे प्रयाण. दुपारी 1 वाजता हेलिपॅड कवलापूर येथे आगमन. दुपारी 1.05 वाजता मोटारीने कवलापूरकडे प्रयाण. दुपारी 1.15 वाजता कवलापूर येथे आगमन व कवलापूर पाणी पुरवठा योजनेचे भूमीपूजन. दुपारी 1.25 वाजता मोटारीने कृष्णाघाट मिरजकडे प्रयाण. दुपारी 1.40 वाजता कृष्णाघाट मिरज येथे आगमन व कृष्णाघाट मिरज येथील रेल्वे उड्डाण पुलाचे भूमीपूजन. दुपारी 1.50 वाजता मोटारीने सुभाषनगरकडे प्रयाण. दुपारी 2 वाजता सुभाषनगर येथे आगमन व सुभाषनगर पाणी पुरवठा योजनेचे भूमीपूजन व कार्यकर्ता मेळावा. दुपारी 3.15 वाजता मोटारीने माधवनगरकडे प्रयाण. दुपारी 3.25 वाजता माधवनगर येथे आगमन व माधवनगर जल जीवन योजना व इतर विविध विकास कामांचे उद्घाटन. दुपारी 3.35 वाजता मोटारीने कवलापूर हेलपॅडकडे प्रयाण. दुपारी 3.45 वाजता हेलिपॅड कवलापूर येथे आगमन व दुपारी 3.50 वाजता हेलिकॉप्टरने निरा नृसिंहपूर जि. पुणेकडे प्रयाण.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.