महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे बुधवारी सांगली जिल्हा दौऱ्यावर
सांगली दि. 5 : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे बुधवार, दि. 11 मे 2022 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार, दि. 11 मे रोजी सकाळी 9.45 वाजता नरसोबाची वाडी जि. कोल्हापूर येथून सांगली कडे प्रयाण. सकाळी 10.15 वाजता श्री गणेशाचे दर्शन, सांगली. सकाळी 11.10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सांगली कडे प्रयाण. सकाळी 11.15 ते दुपारी 1.10 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व सांगली जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी यांची कोरोनाबाधितांना मदत, संभाव्य पुरस्थिती नियोजन आढावा बैठक, स्थळ - जिल्हाधिकारी कार्यालय सांगली. दुपारी 1.30 ते 2.30 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह येथे राखीव. दुपारी 2.30 वाजता पत्रकार परिषद, स्थळ - शासकीय विश्रामगृह सांगली. दुपारी 3.15 वाजता शिवसेना पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते समवेत चर्चा. दुपारी 3.40 वाजता एकल महिलांच्या सोबत संवाद, स्थळ - शासकीय विश्रामगृह सांगली. दुपारी 4.15 वाजता बलवडी ता. खानापूरकडे प्रयाण. सायंकाळी 5 वाजता बलवडी येथे आगमन व कार्यक्रम उपस्थिती. सायंकाळी 6 वाजता श्री देवदत्त राजोपाध्ये, विटा ता. खानापूर येथे भेट. सायंकाळी 7 वाजता सिल्वर रॉक्स शिवाजी नगर, पुणे कडे प्रयाण.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.