Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शंभरावे अधिवेशन हे सांगलीकरांचे अधिवेशन.. भव्य दिव्यच होणार..संपूर्ण सहकार्य करु! - पृथ्वीराज पाटील

शंभरावे अधिवेशन हे सांगलीकरांचे अधिवेशन.. भव्य दिव्यच होणार..संपूर्ण सहकार्य करु!  - पृथ्वीराज पाटील


सांगली दि.८ : दक्षिण भारत जैन सभा ही लवकरच शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजरा करणार आहे. सभेमुळे समाज साक्षर झाला. समाजाची चौफेर प्रगती झाली. सभेचं हे शंभरावे अधिवेशन केवळ जैन समाजाचे नाही तर संबंध सांगलीकरांचे हे अधिवेशन आहे. आम्ही संपूर्ण सहकार्य करु. जैन समाजाला केंद्र व राज्य स्तरावर अल्पसंख्याक दर्जा काँग्रेस पक्षाने दिला आहे. स्व. इंदिरा गांधींनी १९८१ मध्ये भ. गोमटेश महामस्तकाभिषेकवेळी पुष्पवृष्टी केली होती. कृषिप्रधान जैन समाजाला आमचे कायम सहकार्य राहील व अधिवेशनाच्या निमित्ताने शासनाकडे ज्या मागण्या करण्यात येतील त्या मंजूर होण्यासाठी महाआघाडी सरकारकडे जोरदार पाठपुरावा करुअसे प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी केले.राजमती भवन येथे आयोजित दक्षिण भारत जैन सभेच्या शंभराव्या अधिवेशनाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी अधिवेशनास भरीव देणगी जाहीर केली! अध्यक्षस्थानी माजी आमदार शरद पाटील होते.भालचंद्र पाटील यांनी सभेचे काम.. अधिवेशन स्वरुप व जैन समाजांचे प्रश्न यांचा आढावा घेतला. 

यावेळी प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी अधिवेशनास संपूर्ण सहकार्य करु असे सांगितले. सुरेश पाटील यांनी विविध मागण्या व वहान व पार्किंग व्यवस्था माहिती दिली. शशिकांत राजोबा यांनी स्वागत तर प्रा. एन.डी.बिरनाळे यांनी आभार मानले. यावेळी सुरेश पाटील समडोळी दिलीप वग्याणी राजारामबापू पाटील, सचिन पाटील, काका धामणे सागर वडगांवे, डॉ. अण्णासाहेब चोपडे, जि. प. सदस्य विशाल चौगुले, अभय पाटील,कुबेर शेडबाळे वकील, शांतीनाथ नंदगांवे, पोपटाला डोर्ले, जयपाल चिंचवाडे, सुदर्शन हेरले, डॉ. चंद्रकांत चौगुले, सरपंच श्वेता बिरनाळे, अविनाश पाटील, सांगली मिरज व कुपवाड व परिसरातील जैन समाज मोठय़ा संख्येने उपस्थित होता.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.