Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अंकलखोप येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व्यवस्थापनाबाबत तातडीने समितीची स्थापना करा समाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या सूचना

अंकलखोप येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व्यवस्थापनाबाबत तातडीने समितीची स्थापना करा समाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या सूचना



मुंबई, दि. २४: सांगली जिल्ह्यातील अंकलखोप (ता. पलूस) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे हस्तांतरण ग्रामपंचायतीला करण्याबरोबरच स्मारकाच्या दैनंदिन व्यवस्थापनाबाबत समिती स्थापन करण्याच्या सूचना समाजिक न्याय राज्यमंत्री राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी आज केल्या. त्यासोबतच ६ डिसेंबरपुर्वी या स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यात यावा, याबाबत आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत निर्देश देण्यात आले. बैठकीला सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे, अंकलखोपचे सरपंच अनिल शिवलिंग विभुते आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते, तर दूरदृश्य प्रणालीवर सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी असलेल्या अंकलखोप येथील स्मारकाची देखभाल होणे आवश्यक आहे. ग्रामपंचायतीला हे स्मारक हस्तांतरित करण्यापुर्वी त्या स्मारकाच्या दैनंदिन व्यवस्थापनाचा खर्चाबाबत तरतूद आवश्यक आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव करून शासनास पाठवावा, त्यावर निर्णय घेण्यात येईल, असे राज्यमंत्री डॉ. कदम यांनी सांगितले. तसेच तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्याची कार्यवाही ६ डिसेंबरपुर्वी करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

अंकलखोप येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात आले असून १४ एप्रिलला तेथे अनुयायांची मोठी गर्दी होते. या स्मारकाची देखभाल आणि दुरूस्ती आवश्यक असून त्यासाठी राज्यमंत्री डॉ. कदम यांच्या पुढाकाराने व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात येणार आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.