नगरभुमापन कार्यालयाचा सावळा गोंधळ थांबवा: मासाळे
सांगली दिं.: येथील नगर भूमापन कार्यालयात सावळा गोंधळ सुरू आहे.लोकांची अडवणूक करून वारेमाप पैसे उकळण्याचे प्रकार सुरू आहेत. या कार्यालयाच्या कारभाराची चौकशी करून संबंधितावर तातडीने कारवाई करावी अन्यथा तीव्र जनआंदोलन करु असा इशारा कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीस अशोक मासाळे यांनी दिला आहे.
पुणे येथील उपविभागीय आयुक्त नगर भूमापन विभाग यांच्याकडे मासाळे यांनी लेखी तक्रारी द्वारे हा इशारा दिला आहे.
सांगलीच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत हे कार्यालय आहे.या कार्यालयाचा सद्या कार्यभार ज्योती पाटील यांच्या कडे आहे.मात्र या कार्यालयातील कर्मचारी त्यांना दाद देत नाहीत.सन्नके, आणि सुर्यवंशी नामक लिपीकच हे संपूर्ण कार्यालय चालवितात.वेळकाढूपणामुळे नागरिकांना किरकोळ कामासाठी हेलपाटे मारावे लागतात.कामासाठी आणि पैसे वसूली साठी काही एजंटांची नेमणूक करण्यात आली आहे.या एजंटामाफत गेले तरच काम होते अन्यथा हेलपाटे मारण्याची शिक्षा मिळते.परवा एक एजंट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागला.पण त्याच्या मुळापर्यंत तपास गेला नाही.यामध्ये सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई व्हावी.तसेच कार्यालयात सी.सी.टी.व्ही.यंत्रणा बसवावी.कायालयाचे फायर ऑडिट करून घ्यावे, लोकांची कायदेशीर कामे तातडीने मार्गी लावली जावीत. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ही मासाळे यांनी निवेदनात दिला आहे.हे निवेदन राज्याचे महसूल मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांना देण्यात आली आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.