Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मंकीपॉक्स व्हायरसवर औषध सापडलं; लॅन्सेट रिसर्चमध्ये झाला खुलासा

 मंकीपॉक्स व्हायरसवर औषध सापडलं; लॅन्सेट रिसर्चमध्ये झाला खुलासा


अमेरिका आणि युरोपसह जगातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्स व्हायरस वेगाने पसरत आहे. याच दरम्यान, एक दिलासादायक माहिती समोर आली आहे, त्यानुसार या धोकादायक आजारावर उपचार करता येणार आहेत. या आजारात अँटीव्हायरल औषधे आराम देऊ शकतात, असं लॅन्सेटच्या अभ्यासातून समोर आलं आहे.

लॅन्सेट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, अँटीव्हायरल औषधे मंकीपॉक्स रोगातून लवकर बरे होण्यासाठी प्रभावी ठरू शकतात. ही औषधे लक्षणे कमी करू शकतात आणि रुग्णाला रोगातून लवकर बरे होण्यास मदत करतात. हा रिसर्च लिव्हरपूल युनिव्हर्सिटी हॉस्पिटल्स एनएचएस फाउंडेशन ट्रस्ट, ब्रिटन येथे करण्यात आला आहे.

ब्रिटनमध्ये झालेल्या एका संशोधनाच्या आधारे हा अभ्यास करण्यात आला आहे. हे संशोधन 2018 ते 2021 दरम्यान युनायटेड किंगडममधील मंकीपॉक्सच्या 7 रुग्णांवर करण्यात आले. या 7 रुग्णांपैकी 3 रुग्ण पश्चिम आफ्रिकेतून आले होते आणि उर्वरित चार रुग्णांमध्ये संसर्ग एकातून दुसऱ्यामध्ये पसरला होता.

रुग्णांवर वापरली जातात 2 औषधे

रुग्णांवर दोन औषधांचा वापर करण्यात आला. ही औषधे Brincidofovir आणि Tecovirimat आहेत. पहिल्या औषधाचा वापर करूनही रुग्णांना फारसा फायदा झाला नाही. हे औषध तीन रुग्णांवर वापरले गेले. औषध घेतल्यानंतर या रुग्णांच्या लिव्हरच्या एन्झाइमची पातळीही थोडीशी खालावली. जरी सर्व रुग्ण काही वेळाने बरे झाले. 2021 मध्ये, युनायटेड किंगडममधील एका रुग्णामध्ये दुसरे औषध Tecovirimat वापरले गेले, हा रुग्ण लवकर बरा झाला आणि दुसर्‍या व्यक्तीला संसर्ग होण्याचा धोकाही कमी झाला.

संशोधकांना असे आढळून आले आहे की मंकीपॉक्स व्हायरस रक्तात आणि लाळेमध्ये देखील आढळून आले आहेत. या अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की याआधी मंकीपॉक्स इतक्या मोठ्या प्रमाणावर कधीच पसरला नव्हता. पण तरीही त्याचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होण्याचा धोका कमी आहे. याशिवाय, कमी लोकांवर केलेल्या अभ्यासामुळे, संशोधकांनी कोणतेही अँटीव्हायरल औषध वापरताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

संशोधनाचे प्रमुख लेखक एडलर यांनी दिलेल्या माहितीनुसार 'महामारीच्या या नवीन उद्रेकाने ब्रिटनमध्ये पूर्वीपेक्षा जास्त रुग्णांना प्रभावित केलं आहे, तर मंकीपॉक्स पूर्वी लोकांमध्ये वेगाने पसरत नव्हते, त्यामुळे एकूणच सध्या धोका कमी आहे.' सध्या, मंकीपॉक्सवर कोणताही अधिकृत उपचार नाही आणि त्याच्या संसर्गाच्या कालावधीची माहिती देखील मर्यादित आहे, तर संसर्गाचा प्रसार 5 ते 21 दिवसांपर्यंत असतो.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.