Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पेट्रोल पंप, हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज गायब

पेट्रोल पंप, हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज गायब


इस्लामपूर प्रकरणातील त्या सदुनिचे काम असल्याचा संशयिताचा आरोप

सांगली: इस्लामपूर येथील गोवा बनावट दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या त्या सदुनिने ज्या पेट्रोल पंपासमोर कंटेनरवर कारवाई केली त्या पेट्रोल पंपाच्या सीसीटीव्हीचे फुटेज तसेच संशयिताला घेऊन बसलेल्या पेठ नाक्यावरील एका हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज गायब झाले आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असलेल्या त्या सदुनिनेच ते गायब केल्याचा आरोप या प्रकरणातील एका संशयिताने सांगली दपर्ण शी बोलताना केला.   

इस्लामपूर येथे गेल्या महिन्यात गोवा बनावटीच्या दारूचा कंटेनर पकडण्यात आला होता. येलूर फाट्यावरील एका पेट्रोल पंपासमोर ही कारवाई करण्यात आली होती. या कारवाईचे संपूणर् चित्रीकरण त्या पेट्रोल पंपावर असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची एका संशयिताला खात्री होती. संशयित कोठडीतून बाहेर आल्यानंतर त्याने त्या पेट्रोल पंप चालकाशी संपर्क साधला. 

त्यावेळी त्याला कारवाई झालेल्या दिवशीचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज डिलीट झाल्याची माहिती दिली. तर येलूर फाट्यावर कारवाई केल्यानंतर त्या सदुनिने संशयिताकडे पैशांची मागणी केली होती. याबाबत तो सदुनि, संशयित आणि त्याचा एक मित्र यांची पेठ नाक्यावरील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये चर्चा झाली होती. ते हॉटेलमध्ये बसलेले असताना सदुनिने आणलेल्या खासगी व्यक्तींनी संशयिताची चारचाकी गाडीही बराच वेळ कोठेतरी नेली होती. त्या हॉटेलमध्येही संशयिताने सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजबाबत चौकशी केल्यानंतर त्या हॉटेलमधील फुटेजही डिलीट केल्याचे दिसून आले. दरम्यान या दोन्ही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज त्या सदुनिनेच डिलीट करायला लावली असावी असा आरोप त्या संशयिताने सांगली दपर्ण शी बोलताना केला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.