भाजपा सांगली शहरजिल्ह्या तर्फे शिवजयंती साजरी ......
सांगली सोमवार २ मे २०२२ :- आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात व सांगली येथील शिवतीर्थावर परंपरेने महाराष्ट्राचे आराध्य दैवत व हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी “लोकमान्य टिळकांनी शिवजयंती साजरी करण्याचा पायंडा पाडला आणि पूर्ण महाराष्ट्रात शिवजयंती जोरदार साजरी होऊ लागली. इंग्रजांच्या विरोधात तरुणांची एकी होणं आणि तरुण राष्ट्रविचारी होणं गरजेचं होतं त्यासाठी टिळकांनी शिवजयंतीचा कार्यक्रम दरवर्षी मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जी परंपरा आजही चालू आहे.” असे आमदार सुधीरदादा गाडगीळ पुष्पहार हार अर्पण करून अभिवादन करताना म्हणाले.
यावेळी प्रवक्ते मुन्नाभाई कुरणे, समाजकल्याण सभापती सुब्राव तात्या मद्रासी, नगरसेवक संजय कुलकर्णी, युवराज बावडेकर, गटनेते विनायक सिंहासने, नगरसेविका साविताताई मदने, ओबीसी मोर्चा अध्यक्ष अमर पडळकर, प्रियानंद कांबळे, शरद नलवडे, अविनाश मोहिते, गौस पठाण, उदय बेलवलकर, गणपती साळुंखे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.