Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

घरगुती आणि व्यावसायिक दोन्ही सिलिंडर महागले

घरगुती आणि व्यावसायिक दोन्ही सिलिंडर महागले


नवी दिल्ली : तेल आणि गॅस कंपन्यांनी गुरुवारी सकाळी सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक डोस दिला. घरगुती आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. या महिन्यात दुसऱ्यांदा दर वाढवण्यात आले आहेत.राजधानी दिल्लीत एलपीजी सिलिंडरने आता 1000 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. आज 14 किलोच्या घरगुती सिलेंडरच्या दरात 3.50 रुपयांची वाढ झाली आहे, तर 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 8 रुपयांची वाढ झाली आहे.

गुरुवारपासून दिल्लीत 1003 रुपये, मुंबईत 1002.50 रुपये, कोलकात्यात 1029 रुपये आणि चेन्नईमध्ये 1018.50 रुपयांना घरगुती एलपीजी सिलिंडर उपलब्ध होणार आहे. यापूर्वी 7 मे रोजी घरगुती सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

आता 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर दिल्लीत 2354 रुपये, कोलकात्यात 2454 रुपये, मुंबईत 2306 रुपये आणि चेन्नईमध्ये 2507 रुपयांना मिळणार आहे. आता देशभरात घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 1000 रुपयांच्या पुढे गेली आहे. एका वर्षात घरगुती सिलिंडरची किंमत 800 ते 1000 रुपयांच्या पुढे गेली आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.