Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मनपा कार्यक्षेत्रामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्वांसाठी घरे

मनपा कार्यक्षेत्रामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्वांसाठी घरे


मनपा कार्यक्षेत्रामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्वांसाठी घरे तीन दिवसीय बांधकाम परवाने कार्यशाळा : मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांची माहिती


सांगली: मनपा कार्यक्षेत्रामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्वांसाठी घरे तीन दिवसीय बांधकाम परवाने कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याची माहिती मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर सविस्तर प्रकल्प अहवाल (डि.पी.आर.) मधील ज्या लाभार्थ्यांचे बांधकाम परवाने काढलेले नाहीत अथवा प्रस्ताव जमा केले असून त्यामधील त्रुटी पूर्तता न केल्यामुळे अद्याप प्रलंबित आहेत. 

अशा लाभार्थीसाठी दिनांक ३० मे ते १ जून २०२२ रोजी अनुक्रमे डि.पी.आर. ८०,९१,६०,१२० आणि १६५ मधील लाभार्थ्यांनी दुपारी ४ ते ६ पर्यंत कै. पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृह, मनपा मुख्यालय सांगली येथे आपलेकडील आवश्यक कागदपत्रे, बांधकाम परवण्याकरिता प्रस्ताव जमा केला असल्यास त्याची पोहोच/फाईल सोबत सदर कार्यशाळेत उपस्थित राहावे. अति आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यशाळा आयोजित केली असून नगररचना विभागाचे अधिकारी त्यासाठीचे मार्गदर्शन करून त्याच ठिकाणी प्रकरणे निकाली काढणार आहेत. या कार्यशाळेच्या अधिक माहितीसाठी प्रसाद जामसांडेकर  (M.I.S. Specialist) - ९४२२६१८५०८ सागर शिंदे (Social Development Specialist) - ९८३४२९३४५६ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.