Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मा. आयुक्त साहेब यांना भारतीय ब्ल्यू पँथर च्या वतीने

मा. आयुक्त साहेब यांना भारतीय ब्ल्यू पँथर च्या वतीने

पाण्यासाठी निवेदन....

लवकरच घागर मोर्चा.... 

गावभागातील सिद्धार्थ परिसर, रोहीदास नगरमध्ये पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब सांगली शहरातील प्रमुख समजला जाणारा आणि एक पाय   घरात व एक पाय नदीत असणारा  भाग म्हणजे गावभागातील सिद्धार्थ परिसर, रोहीदास नगर, हरिपूर रोड येथील नागरिक गोरं गरिब मागास वर्गीय कस्टकरीसमाज मोठ्या प्रमाणात असल्याने या भागात अनेक महिन्यांपासून अपूरा पाणी पुरवठा होत असून अनेक वेळा या भागातील नगरसेवकांना, अधिकारी यांना विचारले असता फक्त आश्वासन दिले जातात, येथील नागरिकांच्या चर्चांमधून असे कळते की नगरसेवक नगरसेविकांनी मागासवर्गीय भाग पाण्यापासून वंचित ठेवून आपल्याच मतदारसंघात पाणी वळवल्याने सिद्धार्थ परिसर, रोहीदास नगर या मागासवर्गीय भागाला जाणीवपूर्वक पाणि दिले जात नाही, पाण्यापासून वंचित ठेवूले जात आहे.

तरी आयुक्त साहेब आम्ही सिद्धार्थ परिसर, रोहीदास नगर च्या नागरिकांच्यावतीने आम्ही विनंती करतो की आपण यांमध्ये आपण जातीने लक्ष घालून लवकरात लवकर सिद्धार्थ परिसर रोहीदास नगर, ढवळे तालिम परिसरमधील पाणी पुरवठा पुर्वी ज्या पध्दतीने केला जात होता त्याच पद्धतीने पाणी पुरवठा पूर्ववत करण्यात यावा अन्यथा आम्हाला पॅंथर च्या स्टाईलने महापालिकेवर मोर्चा आणू, आंदोलन करतेवेळी का ही अनुचित प्रकार घडलेस त्याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा भारतीय ब्ल्यू पँथर चे संस्थापक अध्यक्ष नितीन गोंधळे व कार्याध्यक्ष धनंजय खांडेकर व सिद्धार्थ परिसर, रोहीदास नगर मधील नागरिक यांनी दिला आहे निवेदनावर नितिन गोंधळे व धनंजय खांडेकर यांच्या सह्या आहेत. 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.