Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गोसीखुर्दच्या शेतकऱ्यांचा पश्चिम महाराष्ट्रात अभ्यास दौरा पालकमंत्री जयंत पाटील शेतकऱ्यांच्या उन्नती व भरभराटीसाठी करणार मार्गदर्शन

गोसीखुर्दच्या शेतकऱ्यांचा पश्चिम महाराष्ट्रात अभ्यास दौरा पालकमंत्री जयंत पाटील शेतकऱ्यांच्या उन्नती व भरभराटीसाठी करणार मार्गदर्शन


सांगली, दि. 25,  : गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील नागपूर, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यातील निवडक 200 प्रगतीशिल शेतकऱ्यांसाठी पश्चिम महाराष्ट्रातील पिक पध्दतीचा अभ्यास करणे अवलंब करणे या दृष्टीने दिनांक 25 ते 29 मे 2022 या कालावधीत शेतकरी समृद्धी अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर चे कार्यकारी संचालक राजेंद्र मोहिते यांचे हस्ते हिरवा झेंडा दाखवून दिनांक 25 मे रोजी अभ्यास दौऱ्याला सुरुवात केली. या प्रसंगी गोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता आशिष देवगडे, अधीक्षक अभियंता जगत टाले, कार्यकारी अभियंता किशोर दमाह, सुहास मोरे आणि इतर अभियंते उपस्थित होते. दिनांक 28 मे 2022 रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील हे शेतकऱ्यांच्या उन्नती व भरभराटीसाठी तसेच चांगल्या गोष्टीचे अनुकरण करण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत.

गोसीखुर्द प्रकल्प पुर्णावस्थेकडे येतांना प्रकल्पाच्या पाण्याचा सुयोग्य वापर करावा व लाभधारक शेतकऱ्यांनी पिक पध्दतीत बदल करून वैयक्तिक व राष्ट्रीय उत्पन्नात भर घालावी या दृष्टीने अभ्यास करण्यासाठी पंढरपूर, बारामती, इस्लामपूर, सांगोला व सोलापूर या भागातील उस लागवड, आमराई फळ बाग, कृषी विद्यापीठ संशोधन केंद्र, उस कारखाना व निवडक शेतांना भेट देवून पाहणी करणार आहेत. उस लागवडीमधील तज्ञ, कृषी रत्न संजय माने यांच्या शेताला भेट देवून त्यांचेही मार्गदर्शन गोसीखुर्द लाभधारकांना मिळणार आहे.

गोसीखुर्द प्रकल्पातील लाभधारकांना प्रकल्पाच्या पाण्याचा जास्तीत जास्त लाभ घेण्याच्या दृष्टीने पुढाकार घेण्याचे आवाहन गोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता आशिष देवगडे यांनी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.