महापालिका शाळांमध्ये शिकवण्याच्या अनुभवाच्या संधीचा लाभ घ्या : विनामोबदला शिकवू इच्छिणाऱ्या बीएड/ डीएड उमेदवारांनी स्वेच्छेने महापालिकेकडे अर्ज करावेत मनपाआयुक्त नितीन कापडणीस यांचे आवाहन
सांगली: सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या शाळेमधील विद्यार्थ्यांना केवळ कामाचा अनुभव म्हणून विनामोबदला शिकवू इच्छिणाऱ्या बीएड/ डीएड उमेदवारांकडून स्वेच्छेने अर्ज मागविण्यात येत आहेत. या उमेदवारांनी महानगरपालिकेच्या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते आठवी मधील विद्यार्थ्यांना शालेय वेळेत शिकवण्याचे काम करण्याचे आहे . या मोबदल्यात त्यांना कोणतेही मानधन अनुज्ञेय असणार नाही. केवळ भविष्यात अन्यत्र नोकरी मिळण्यासाठी अनुभव म्हणून ही संधी उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशी माहिती मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.
या उमेदवारांना महानगरपालिकेमार्फत महापालिकेच्या शाळेत शिकवल्याबाबतचा अनुभवाचा दाखला देण्यात येईल. इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज मा. आयुक्तसो यांच्या नावे प्रशासन अधिकारी (शिक्षण मंडळ) त्रिकोणी बाग, सिव्हिल हॉस्पिटल जवळ, सांगली येथे दिनांक १८ मे २०२२ पर्यंत आपल्याकडील सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत. इच्छुकांनी कार्यालयीन संपर्क करण्यासाठी
सांगली कार्यालय - २३७३७२१ते २३/२३२३००६, २३२५६०५
मिरज कार्यालय - २२२३२७१ ते ७५
कुपवाड कार्यालय - २३४६०८१
फॅक्स नंबर - (०२३३) २३२३९०७ येथे किंवा
ई मेल smkcorporation@gmail.com वर अर्ज सादर करावेत असे आवाहनही आयुक्त कापडणीस यांनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.