Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत माध्यमीकचा शिक्षणाधिकाऱ्यासह अधीक्षकाला पावणेदोन लाखांची लाच घेताना अटक

सांगलीत माध्यमीकचा शिक्षणाधिकाऱ्यासह अधीक्षकाला पावणेदोन लाखांची लाच घेताना अटक



लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, जिल्हा परिषद वतर्ळात खळबळ

सांगली : तक्रारदारासह दोन शिक्षकांचे पदवीधर वेतन श्रेणी मान्यतेचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी पावणेदोन लाखांची लाच घेताना माध्यमिक विभागाच्या शिक्षण अधिकाऱ्यासह अधीक्षकाला रंगेहात पकडण्यात आले. शिक्षणाधिकारी विष्णू मारूती कांबळे (वय ५८, रा. वसंत कॅलनी), अधीक्षक विजयकुमार अशोक सोनवणे (वय ४१, रा. अहिल्यानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शनिवारी पहाटे सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे जिल्हा परिषद वतुर्ळात खळबळ उडाली आहे. 

तक्रारदार आणि त्याच्या दोन शिक्षक मित्रांनी पदवीधर वेतन श्रेणी मान्यतेचा प्रस्ताव दिला होता. तो प्रस्ताव मंजूर करण्यासाठी कांबळे आणि सोनवणे यांनी तिघांकडे प्रत्येकी ६० हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदाराने याबाबत सांगलीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तीन वेळा या तक्रारीची पडताळणी केली. त्यामध्ये दोघांनीही पावणेदोन लाखांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर शनिवारी पहाटे अधीक्षक सोनवणे याच्या घराजवळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला होता. त्यावेळी त्याला पावणेदोन लाखांची लाच घेताना पकडण्यात आले. त्यानंतर सोनवणे याला घेऊन पथक कांबळे यांच्या घरी गेले. तेथे त्यांना सोनवणेकडून पैसे घेताना रंगेहात पकडण्यात आले. दोघांनाही ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुजय घाटगे यांच्या मागर्दशर्नाखाली पथकाने केली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.