Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शिरढोणमध्ये गोळीबार करत एटीएम मशीन पळवले

शिरढोणमध्ये गोळीबार करत एटीएम मशीन पळवले


मध्यरात्रीची घटना  सहा जणांचे कृत्य, प्रत्यक्षदशीर् वृद्धाची पोलिसांना माहिती

सांगली : कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण येथे शुक्रवारी मध्यरात्री दोन ते अडीचच्या दरम्यान चोरट्यांनी गोळीबार करत बॅंक आफ महाराष्ट्रचे एटीएम मशीन पळवल्याची घटना घडली. गोळीबारासह चोरीची माहिती मिळताच जिल्हा पोलिस प्रमुख दीक्षित गेडाम यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान एका वृद्धाने ही घटना पाहिली असून सहा जणांनी कटरने मशीन तोडून पूर्ण मशीनच पळवल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. या घटनेचा पोलिस युद्धपातळीवर तपास करत आहेत. 

कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण येथे बॅंक आफ महाराष्ट्रचे एटीएम केंद्र आहे. शुक्रवारी मध्यरात्री एका गाडीतून सहाजण तेथे आले. कटरच्या सहाय्याने ते मशीन तोडत होते. त्यावेळी झालेल्या आवाजाने शेजारी राहणारा एक वृद्ध जागा झाला. त्याने आरडाओरडा करताच चोरट्यांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला. त्यानंतर सहा चोरट्यांनी एटीएम पळवून नेले. पोलिस घटनास्थळी पोहोचले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.