Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'एखाद्याला 'टकल्या' म्हणणं हा लैंगिक छळाप्रमाणेच गंभीर गुन्हा', न्यायालयाने सुनावला महत्त्वपूर्ण निकाल

'एखाद्याला 'टकल्या' म्हणणं हा लैंगिक छळाप्रमाणेच गंभीर गुन्हा', न्यायालयाने सुनावला महत्त्वपूर्ण निकाल


नवी दिल्ली 14 मे : टोनी फिन नावाच्या व्यक्तीने वेस्ट यॉर्कशायर स्थित ब्रिटिश बंग कंपनीवर अन्यायकारक पद्धतीने कामावरुन काढल्याचा आणि लैंगिक भेदभावाचा आरोप केला होता.

फिनला गेल्या वर्षी मे महिन्यात कंपनीतून काढून टाकण्यात आलं होतं. त्याने कंपनीत 24 वर्षे इलेक्ट्रिशियन म्हणून काम केलेलं. याप्रकरणी निकाल सुनावताना एखाद्याला ऑफिसमध्ये टकला म्हणणं, हे लैंगिक शोषणाप्रमाणेच असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. डॉक्टरची आत्महत्या; आधी व्हॉट्सअॅपवर स्टाफला केला मेसेज, म्हणाला....

न्यायाधिकरणाने आपल्या निकालात म्हटलं आहे की, "आमच्या निकालात, एकीकडे 'टक्कल' हा शब्द आणि दुसरीकडे लैंगिक छळ यांचा संबंध आहे." न्यायाधिकरणाने स्वीकार केलं की ब्रिटिश बंग कंपनी लिमिटेडच्या वकिलांच्या म्हण्यानुसार, पुरुषांप्रमाणेच महिलांनाही टक्कल पडू शकतो, हा मुद्दा बरोबर आहे. या निकालात म्हटलं आहे की टक्कल पडणे हे महिलांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त दिसून येतं आणि आम्हाला ते नैसर्गिकरित्या लैंगिक छळाशी संबंधित असल्याचं आढळलं आहे. फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये उत्तर इंग्लंडमधील शेफिल्डमध्ये या प्रकरणाची सुनावणी झाली. या आठवड्याच्या सुरुवातीला लैंगिक छळ, अयोग्य आणि चुकीच्या पद्धतीने कामावरुन काढणे हे फिनचे दावे कायम ठेवण्यात आले आहेत.

फिनला मिळणाऱ्या भरपाईबाबत निर्णय घेण्यासाठी पुढे एखादी तारीख निश्चित केली जाईल. पत्नी कुणाशीतरी फोनवर बोलत होती, दारूच्या नशेत पतीने तिच्यावर केला चाकूने हल्ला टक्कल पडणे ही जगातील अनेक देशांमध्ये पुरुषांमध्ये झपाट्याने वाढणारी समस्या आहे. याकडे आता सामाजिक समस्या आणि भेदभाव म्हणूनही पाहिले जात आहे. टक्कल पडलेल्यांना अनेकदा निराशाजनक टीकेचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर कोर्टाचा हा निकाल महत्त्वपूर्ण मानला जात आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.