मनपा आयोजित स्वच्छ टेक्नॉलॉजी चॅलेंज कॉम्पिटेशन स्पर्धेचे विजेते जाहीर : पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्याहस्ते पारितोषिक वितरण
सांगली: माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून घेण्यात आलेल्या स्वच्छ टेक्नॉलॉजी चॅलेंज कॉम्पिटेशन स्पर्धा विजेते आज जाहीर करण्यात आले. दि १ मे कामगार दिनाच्या वेळी पोलीस परेड ग्राउंड सांगली येथे पालक मंत्री जयंतराव पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिस आणि प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक क्रेडॉस इन्फ्रा प्रा.ली.(₹५१,०००), द्वितीय क्रमांक वेस्ट कार्ट (₹४१,०००), तृतीय क्रमांक स्पंदन प्रतिष्ठान (₹३१,०००), चतुर्थ क्रमांक आण्णासाहेब डांगे कॉलेज (₹२१,०००) आणि पंचम क्रमांक आय स्मार्ट टेक्नो सोल्युशन्स (₹११,०००)असे पाच क्रमांक या स्पर्धेत काढण्यात आले.
स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन या विषयाशी संबधीत नाविन्यपूर्ण संकल्पनांना प्रोत्साहन देणे हा या स्पर्धेचा उद्देश होता. यामध्ये कोणत्याही गावातील शहरातील विद्यार्थी, नागरिक, स्टार्टअप, उद्योजक, शैक्षणिक संस्था, शासकीय व निमशासकीय व इतर संस्था तसेच विविध ग्रुप यांना भाग घेतला होता. दि ८ मार्च २०२२ ला या स्पर्धेचे प्रदर्शन नेमिनाथनगर कल्पद्रुम ग्राउंड येथे भरविण्यात आले होते. ४० स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यातील हे ५ प्रकल्प शासनाने ठरवून दिलेल्या निकषांमध्ये परिक्षकांनी उत्कृष्ट ठरविले. या बक्षिस वितरणावेळी महापौर दिग्विजय सुर्यवंशी, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, मनपा आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त चंद्रकांत आडके, आरोग्यधिकारी डॉ. रवींद्र ताटे, मनपा अधिकारी आणि कर्मचारी आदी उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.