Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महा.ओनरशिप फ्लॅटस् लॉ, ग्राहक साक्षरता अभियान

महा.ओनरशिप फ्लॅटस् लॉ, ग्राहक साक्षरता अभियान    


विषय: 
एखाद्या फ्लॅटधारकाला आपला फ्लॅट मृत्यूनंतर कुटुंबातील ठराविक व्यक्तींनाच मिळावा, अशी इच्छा असल्यास कोणत्या कायद्याची पूर्तता करावी लागते; तसेच कुटुंब प्रमुखाने विशिष्ट हेतूने आपल्या पत्नीच्या नावे फ्लॅट घेतला असेल व नोमिनेशन फॉर्म मध्ये सदरच्या व्यक्तींच्या मुलाने गैरफायदा घेऊन सही घेतली असेल, तर सदरचा फ्लॅट तिच्या मुलाकडे जातो काय, याबाबत पत्नीने इच्छापत्र केल्यास नॉमिनेशनप्रमाणे फ्लॅट जाईल की इच्छापत्रानुसार?

उत्तर: सोसायटीचे नॉमिनेशन हे सोसायटीमधील सभासदाच्या मृत्युपश्चात सोसायटीच्या व्यवहाराबाबत कोणत्या व्यक्तींशी कारभार चालू ठेवावा, याबाबतची व्यवस्था असते. नॉमिनेशन हे हिंदू वारसा कायदा किंवा इतर वारसा कायद्यांचा नवीन नियम घालून देत नाही. एखाद्या व्यक्तीने नॉमिनेशन केले म्हणजे ज्या व्यक्तींच्या नावे नॉमिनेशन केले असेल, ती व्यक्ती फ्लॅटची मालक झाली असे मुळीच नव्हे. जर एखाद्या व्यक्तीने सक्षम न्यायालयाकडून वारसा हक्कांबाबतचे सर्टिफिकेट आणले तर नॉमिनेशन हे दुय्यम महत्त्वाची ठरते व सोसायटीमधील सदनिका सदर व्यक्तींच्या नावे करावी लागते. परंतु जर एखाद्या व्यक्तींची स्वकष्टार्जित मिळकत व सदरची मिळकत ही मृत्युपत्राद्वारे दुसऱ्या व्यक्तींच्या नावे केलेली असेल व मृत्यूपत्र हे कायद्याच्या चौकटीत वैद्य असेल, तर मृत्युपत्राने केलेली व्यवस्था ही जास्त महत्त्वाचे असून, त्याप्रमाणे संस्थेत अथवा सहकार दरबारी सदनिका तबदील करता येईल.           लेखकः- अॅडव्होकेट-श्री. नितीनजी कांबळे सो.

पुस्तकाचे नांव:- सुरक्षित माझे घर 

शब्दांकन व प्रसारण:- श्री. अमरनाथ स. शेणेकर, कोल्हापूर

7350201000,8459348218       महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅटस् कायदा ची माहिती प्रॉपटी कार्ड, एन् ऐ ऑर्डर बांधकाम परमिशन, बांधकाम पूर्णत्वाचा दाखला,अॅग्रीमेन्ट टू सेल, सेलडिड, मॉरगेज, डिड ऑफ डिक्लेरेशन, कारपेट एरिया, बिल्टअप एरिया, सूपर बिल्टअप एरिया, अॅमेनेटिज् अनेक विषयी माहिती आपणास येथून पुढील लेखात मिळेल त्याचा व्यवस्थीत अभ्यास करून विषय अध्यायन करावेत, 

सूचना;- आपण जमा केलेले पुरावे, उत्तारे, दस्तऐवज, कागदपत्रे, इत्यादी निष्णात वकिलांस दाखवून त्यांचा सल्ला घ्या.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.