सहाय्यक आयुक्त पदी पदोन्न्ती निमित्त आयुब तांबोळी यांचा सन्मान
सांगली दि. 6 : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता व मार्गदर्शन केंद्र सांगली चे कौशल्य विकास अधिकारी आयुब तांबोळी यांची जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता व मार्गदर्शन केंद्र पालघर येथे सहाय्यक आयुक्त पदी पदोन्न्ती झाली आहे. त्या निमित्त श्री. तांबोळी यांचा जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता व मार्गदर्शन केंद्र सांगली येथे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला.
श्री. तांबोळी हे 1991 साली शासकीय सेवेत जिल्हा परिषद पुणे येथे रूजू झाले होते. सन 1999 साली कौशल्य विकास विभागात अधिकारी म्हणून रूजू झाले. यापूर्वी त्यांनी औरंगाबाद, कोल्हापूर, गोंदिया, ठाणे, पुणे व सांगली येथे शासकीय सेवा बजावली आहे. पालघर जिल्ह्याची नव्यानेच निर्मिती झाल्याने त्यांची पदोन्नतीने पालघर जिल्ह्याचे पहिले जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता व मार्गदर्शन केंद्र पालघर चे सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. सांगली चे तृतीय विशेष लेखा परीक्षक वर्ग १ सहकारी संस्था (साखर) बी. बी. यादव यांच्याहस्ते पदोन्नती निमित्त श्री. तांबोळी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सरीता यादव, नगरभूमापन अधिकारी ज्योती पाटील, सहाय्यक आयुक्त ज. बा. करीम, प्र. जिल्हा माहिती अधिकारी रणजित पवार, जिल्हा कौशल्य विकास कार्यालयातील संतोष कोष्टी, मोरेश्वर दुधाळ, बी. ए. साबळे, पंकज कांबळे, संतोष फासे, निशा पाटील, स्मीता जगताप, उदय खरशिंगे आदि उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.