Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

त्या सदुनिला एका राजकीय नेत्याच्या वरदहस्ताची चर्चा

त्या सदुनिला एका राजकीय नेत्याच्या वरदहस्ताची चर्चा 



सदुनिने वरीष्ठांकडे खुलासा केल्याची चर्चा, लवकरच कारवाईची शक्यता

सांगली: इस्लामपूर येथील गोवा बनावट दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या त्या सदुनिवर शिराळा परिसरातील एका किरकोळ पक्षाच्या नेत्याचा वरदहस्त असल्याची चर्चा आहे. दरम्यान या प्रकरणात त्या सदुनिला खुलासा करण्याची नोटीस बजावण्यात आली होती. त्याचा त्याने वरीष्ठांकडे खुलासा केल्याची चर्चा  आहे. त्यामुळे त्याच्यावर लवकरच कारवाई होईल अशीही चर्चा आता एक्साईजच्या वतुर्ळात रंगली आहे.  

इस्लामपूर येथील गोवा बनावटीच्या दारूचे प्रकरण अंगलट येत असल्यचे दिसून येताच त्या सदुनिने एका किरकोळ पक्षाच्या नेत्याच्या घराचे उंबरे झिजवण्यास सुरूवात केली आहे. त्याला सवर् पुरवून त्या नेत्याला या प्रकरणातून सोडवण्यासाठी साकडे घातले आहे. त्या नेत्यानेही त्याला वाचवण्याची सुपारी घेतल्याची इस्लामपूर परिसरात चर्चा आहे. मात्र त्याचा पक्ष किरकोळ असल्याने तसेच तो सत्तेत नसल्याने सदुनिवर कारवाईची टांगती तलवार राहणार आहे. 

आहे. दरम्यान इस्लामपूरचे प्रकरण सांगली दपर्ण ने उचलून धरताच वरीष्ठांनी त्याला खुलासा करण्याची नोटीस पाठवली होती. त्यावर त्याने खुलासा केल्याचेही समजते. मात्र सुरुवातीला त्या सदुनिला पाठीशी घालणाऱ्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनीही आता त्याच्या पाठीवरील हात काढून घेतल्याची चर्चा एक्साईजमध्ये रंगली आहे. त्यामुळेच आता त्या सदुनिवर कडक कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.