महापालिकेच्या पावसाळा पूर्व नालेसफाईला सुरवात...
मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार ड्रोनवरून राहणार नालेसफाईवर नजर : महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांच्याहस्ते नालेसफाई कामास सुरवात पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्याबाबत आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिलेल्या सूचनेनुसार आजपासून महापालिकेकडून पावसाळा पूर्व नालेसफाईला सुरवात केली आहे. या संपूर्ण नालेसफाईवर ड्रोनवरून नजर राहणार आहे. महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांच्याहस्ते या नालेसफाई कामास सुरवात करण्यात आली.
पावसाळापूर्व नालेसफाईमध्ये मिरज आणि कुपवाडसह सांगलीच्या टिम्बर एरिया ते बायपास शेरीनाला हा मुख्य नाला तसेच शहरातील मुख्य आणि मोठे नाले हे स्वच्छ केले जाणार आहे. नाल्याच्या स्वच्छतेबरोबरच नाल्यातील गाळही काढण्यात येणार आहे. तसेच काढलेला गाळ लगेच उचलला जाणार असून पुन्हा तो नाल्यात पडू नये याची दक्षता घेतली जाणार आहे. ही मोहीम एक महिना सुरू राहणार असून यामध्ये एकूण 65 किलोमीटरचे 86 छोटे मोठे नाले स्वच्छ केले जाणार आहेत. यासाठी नालेसफाई कंत्राटदार स्वप्नील सर्जे यांनी 2 पोकलंड, 6 जेसीबी यासह 24 वाहने सज्ज केली आहेत. आज महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांच्याहस्ते पावसाळा पूर्व नालेसफाईला सुरवात करण्यात आली. यावेळी गटनेते विनायक सिंहासने, अतिरिक्त आयुक्त संतोष खांडेकर, उपायुक्त चंद्रकांत आडके, समाजकल्याण समिती सभापती सुबराव मद्रासी, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, संजय यमगर, आरोग्यधिकारी डॉ रवींद्र ताटे, माजी नगरसेवक शिवराज बोळाज, विलास सर्जे, रमेश सर्जे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे, किशोर कांबळे आदींसह कर्मचारी उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.