Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एक्साईजचा सदुनि पुजारी यांच्यावर कडक कारवाई करा

एक्साईजचा सदुनि पुजारी यांच्यावर कडक कारवाई करा



माहिती अधिकार कायर्कतेर् प्रभात हेटकाळे यांची आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

सांगली : गेल्या महिन्यात इस्लामपूर येथे गोवा बनावटीच्या दारूचा कंटेनर पकडण्यात आला होता. एक्साईजच्या इस्लामपूर कार्यालयातील सह. दु. नि. उदय पुजारी हाच गोवा बनावटीची दारू आणण्यातील सुत्रधार होता. शिवाय सह. दु. नि. श्री. उदय पुजारी यानेच येलूर (ता. वाळवा) येथील एका बार चालकाला हाताशी धरून या गुन्ह्यातील संशयिताच्या बँक खात्यावर पैसे पाठवले होते. याबाबत सांगली दपर्णने बातम्यांची मालिका प्रसिद्ध केली होती. त्यामुळे सह. दु. नि. पुजारी यांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी माहिती अधिकार कायर्कतेर् प्रभात हेटकाळे यांनी एक्साईजचे आयुक्त कांतीलाल उमाप यांच्याकडे निवेदानाद्वारे केली आहे. दरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनाही त्यांनी याबाबत निवेदन दिले आहे. 

हेटकाळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गोवा बनावटीच्या दारूचा कंटनेर येलूर फाटा येथे आला असता सह. दु. नि. श्री. उदय पुजारी त्याच्या खासगी चारचाकी वाहनावर अंबर दिवा लावुन तेथे गेले होते. त्यांच्यासमवेत त्यावेळी एक्साईजचे अधिकारी व कर्मचारी नव्हते. तर खासगी व्यक्ती होत्या. कंटेनर पकडल्यानंतर एका संशयिताकडे पुजारी याने लाखो रूपयांची मागणी केली होती. पैसे न दिल्याने संशयितावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्या संशयिताने त्याच्याविरोधात तक्रार करू नये तसेच सांगली दर्पणमध्ये बातम्या येवु नयेत यासाठीही पुजारी यांने दबाव टाकल्याचेही बातम्यामध्ये म्हटले आहे. शिवाय त्या कंटेनरमधील महागड्या उंची दारूच्या बाटल्याही सह. दु. नि. श्री. उदय पुजारी याने काढून घेतल्याचा आरोप संशयिताने केला होता.

या प्रकरणामध्ये सांगली राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील टोळी कार्यरत असुन त्यामध्ये काही कर्मचारी व अधिकारी सामील असण्याची दाट शक्यता नाकरता येत नाही. तसेच या प्रकरणात कारवाई होवु नये म्हणुन सांगलीतील एका वरीष्ठ अधिकाऱ्यांनी पैशाची देवाण घेवाण केल्याचे समजते. यावरून महाराष्ट्र राज्यात संबंधित खात्याची प्रतिमा मलीन झाली आहे, असेही हेटकाळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

याबाबत सांगलीच्या अधीक्षकांनी चौकशी करून त्याचा जबाब नोंदवला आहे. सांगली दर्पणच्या संपादकाचाही जबाब नोंदवला आहे. पुजारी याच्यावर अदयापही कोणतीही कारवाई झाली नाही. तरी या प्रकरणाची उच्चस्तरीय समिती गठीत करून कारवाई करावी. शिवाय पुजारी याच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या सांगलीतील वरीष्ठ अधिकारी यांचीही चौकशी करावी. तसेच या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही हेटकाळे यांनी निवेदनात दिला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.