Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

श्री ए बी पाटील इंग्लिश स्कूलच्या नवीन प्री स्कूलच्या इमारतीचा शुभारंभ

श्री ए बी पाटील इंग्लिश स्कूलच्या नवीन प्री स्कूलच्या इमारतीचा शुभारंभ


सांगली येथील धामणी रोड येथे श्री ए बी पाटील इंग्लिश स्कूल मध्ये प्री स्कूलच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी महापौर श्री सुरेश आ. पाटील व सौ जयश्री सुरेश पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला. या इमारतीचे नाव " ए. बी. पी. मिलेनियम किड्स कॅसल " असे राहील.

श्री ए बी पाटील इंग्लिश स्कूल हि सर्व गोष्टींनी परिपूर्ण आहे यावर्षी स्कूल ३१ व्या वर्षात पदार्पण करत आहे अत्याधुनिक स्तरावरील वर्ग खोल्यासह तीन एकरचा निर्गरम्य परिसर, खेळाचे मैदान हि वैशिष्ठ्ये आहेत. ए. बी. पाटील इंग्लिश स्कूल विद्यार्थ्यासाठी व्यक्तिमत्त्व विकासाची, जीवन कौशल्यात सर्वांगाने विकसित करण्याचे ठिकाण आहे. जीवन कौशल्य विविध उपक्रमाच्या माध्यमातून घडवण्याचा प्रयत्न केला जातो. 

जेथे शैक्षणिक प्रगतीबरोबर त्याचा शारीरिक विकास आपोआप केला जातो. म्हणूच येत्या वर्षात प्री प्रायमरी विभागाच्या मुलांच्या विकास वाढीसाठी नवीन इमारत उभी करत आहोत. मुलांच्या विकासासाठी तसेच सोयी सुविधांसाठी या इमारतीचा खर्च हा तीन कोटी रुपये इतका आहे. ही इमारत इयत्ता प्ले ग्रुप ते सिनियर केजी या वर्गासाठी असणार आहे या इमारतीची वैशिठ्ये म्हणजे या इमारतीचे बांधकाम क्षेत्र १६००० स्के फू चे आहे. या मध्ये ११ आधुनिक पद्धतीचे कलासरूम, २ ऍक्टिव्हिटी रूम इनडोअर गेम, कोर्टयार्ड, प्ले एरिया लायब्ररी, लिफ्टची सोय, मुलांचे व मुलीचे स्वतंत्र टॉयलेट ची व्यवस्था, पालकांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, वेगवेगळ्या नवीन खेळांची ओळख होणे करीता भव्य खेळाचे मैदान याचा हि समावेश आहे. या भूमिपूजन प्रसंगी श्री. राजेसो करोशी, सौ. प्रिया निखिल पाटील, श्री कौशल सु. पाटील, शाळेचे मुख्याधापक श्री सुरज पवार व शाळेमधील सर्व स्टाफ उपस्थित होता.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.