Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाच्या नवीन ५०० खाटांची हॉस्पिटलची तत्काळ प्रशासकीय मान्यता मिळावी आमदार सुधीरदादा गाडगीळ

पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाच्या नवीन ५०० खाटांची हॉस्पिटलची तत्काळ प्रशासकीय मान्यता मिळावी आमदार सुधीरदादा गाडगीळ 

सांगली शनिवार १४ मे 2022 :-  पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयास दिनांक २४.०२.२०२२ रोजी मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या उच्चाधिकारी सचिव समितीच्या बैठकीमध्ये व विभाग क्र ९ वैद्यकीय शिक्षण व औषधेद्रव्ये विभाग यांच्या सचिव समितीच्या शेऱ्यानुसार नवीन ५०० खाटांचे हॉस्पिटल वस्तीगृह, नवीन शवागार इमारतीचे बांधकाम करणे या कामासाठी २३३.३४ कोटी रुपये इतक्या किमतीची तत्वता मान्यता मिळाली असून या कामास तत्काळ प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी राज्याचे वैद्यकीय मंत्री अमितजी देशमुख यांना समक्ष भेटून पत्र दिले. 

तसेच हॉस्पिटलच्या औषध भांडार कक्ष इमारतीचे बांधकाम करणे, ३२० के व्ही २ नग जनरेटर खरेदी करणे व एम, आर. आय मशीन खरेदी इत्यादी कामांना मान्यता मिळावी राज्यात अनेक ठिकाणी जिल्हा रुग्णालये महालॅबला जोडून रुग्णांना निशुल्क सेवा दिली जात आहेत. सांगली मिरजेत मात्र हि सोय नाही. म्हणून सांगली व मिरज येथील शासकीय सिव्हील हॉस्पिटलला शासनाच्या महालॅबला जोडून मोफत चाचण्यांची सुविधा रुग्णांना देण्याची मागणी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी केली. सांगली मिरज हॉस्पिटल ला महालॅब जोडण्यामध्ये ज्या तांत्रिक अडचणी येत आहेत. त्या दूर करून गोरगरीब लोकांना महालॅबचा महाराष्ट्र शासनाच्या निशुल्क प्रयोगशाळेचा लाभ मिळावा यासाठी या प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी शासनाने दूर कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली..


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.