Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मदरशांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य; ओवेसी म्हणाले, आम्हाला योगी सरकारकडून.

मदरशांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य; ओवेसी म्हणाले, आम्हाला योगी सरकारकडून.


नवी दिल्ली : एआयएमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी यूपी मदरशांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य करण्यावर म्हटलं की, आम्हाला भाजप आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या देशभक्तीच्या प्रमाणपत्राची गरज नाही. स्वातंत्र्य लढा लढला जात असताना संघ परिवार त्यात सहभागी झाला नाही, तर मदरसे इंग्रजांविरुद्ध उभे राहिले. आम्हाला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही. ते म्हणाले की, मदरशांमध्ये देशभक्तीचा धडा शिकवला जातो. मात्र लोक त्याच्याकडे संशयाच्या नजरेने पाहतात. त्यामुळेच योगी सरकारने राष्ट्रगीताचा आदेश काढल्याचं ओवेसी म्हणाले.

उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने गुरुवारपासून (दि.12) राज्यातील सर्व मदरशांमध्ये वर्ग सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत म्हणणे बंधनकारक केले आहे. उत्तर प्रदेश मदरसा शिक्षण मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मदरसा शिक्षण मंडळाचे रजिस्ट्रार एसएन पांडे यांनी राज्यातील सर्व मदरशांमध्ये वर्ग सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत गाणे अनिवार्य करण्याच्या निर्णयाबाबत सर्व मदरसा कल्याण अधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.