Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ग्रामसेवक, ग्रामविकास पदे रद्द होणार!

 ग्रामसेवक, ग्रामविकास पदे रद्द होणार!


ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी ही पदे रद्द करून पंचायत विकास अधिकारी हे एकच पद निर्माण करण्याची मागणी ग्रामसेवक संघटनेकडून होत होती. त्यानुसार राज्य सरकारनेही ही पदे रद्द करून एकच पद तयार करण्यासाठी विभागीय आयुक्त, नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे.

याविषयीची माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. ही समिती संबंधित पद निर्माण करण्याची आकश्यकता क त्याची कारणमीमांसा जाणून घेतील. त्याचबरोबर ग्रामविकास अधिकारी क ग्रामसेकक यांची स्वतंत्र वेतनश्रेणी असल्याने एकच पद निर्माण केल्यास अनुज्ञेय वेतनश्रेणीचा अभ्यास करतील. त्याचबरोबर वेतन, वेतनश्रेणी, कालबद्ध पदोन्नती, वित्तीय परिगणना आणि तद्षुंगिक बाबींचा अभ्यास करून शासनाला सहा महिन्यांच्या मुदतीमध्ये अहवाल सादर करणार आहेत. 

विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीमध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक; मुख्य कित्त क लेखा अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव; उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य), जिल्हा परिषद, नाशिक; उपमुख्य कित्त क लेखा अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक; ग्रामसेकक एकनाथ ढाकणे, महाराष्ट्र राज्य ग्रामसेकक संघटनेचे प्रतिनिधी यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली असून उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), जिल्हा परिषद, नाशिक यांची सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.