Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अंकलीतून पाच ते सहा हजार लोक अधिवेशनास येणार.. उपस्थितीचा अंकलीकर उच्चांक मोडणार..!

अंकलीतून पाच ते सहा हजार लोक अधिवेशनास येणार.. उपस्थितीचा अंकलीकर उच्चांक मोडणार..!



दक्षिण भारत जैन सभेच्या शंभराव्या अधिवेशनाचे महत्त्व व सभेच्या कामाची माहिती देण्यासाठी आज मी, अधिवेशन समितीचे उपाध्यक्ष डॉ. अण्णासाहेब चोपडे व दिलीप वग्याणी संथ वाहते कृष्णामाईच्या काठावरील अंकली गावात सायंकाळी ५.३० वा. पोहोचलो. मा. श्रेणिक पाटील व भ. आदिनाथ मंदिर कमिटीचे अध्यक्ष समाजभूषण मा. शशिकांत पाटील यांनी संवाद बैठकीची जय्यत तयारी केली होती. कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था अंकली शाखेत चहापान आवरुन आम्ही बरोबर सहा वाजता मंदीर हाॅलमध्ये पोहोचलो. अंकलीकर आतुरतेने वाट पहातच होते. णमोकार मंत्राने बैठक सुरू झाली.

 स्वागत व प्रास्ताविक मा. श्रेणिक पाटील यांनी केले. डॉ.अण्णासाहेब चोपडे व मा. दिलीप वग्याणी यांनी संपूर्ण अधिवेशन रुपरेषा व आर्थिक सहाय्य आणि उपस्थित बाबत व सरकारकडे जैन समाजाच्या मागण्या यावर छान मार्गदर्शन केले. समाजभूषण शशिकांत पाटील यांनी पाच ते सहा हजार अंकलीकर अधिवेशनास येणारच असे ठामपणे सांगितले व श्रेणिक पाटलांनी क्षणाचीही उसंत न घेता दुजोरा दिला. आम्ही पाऊण तास भ. आदिनाथांच्या साक्षीने सभेच्या १२३ वर्षातील कामाचा चढता आलेख अंकलीकरांसमोर उभा केला. श्री क्षेत्र स्तवनिधी.. सभेची स्थापना.. शैक्षणिक...सामाजिक.. धार्मिक.. सांस्कृतिक.. कृषी विकास कार्य सांगताना स्व. अण्णासाहेब लठ्ठे, स्व. अण्णा फड्याप्पा चौगुले, स्व. कळंत्रे अक्का, सा. प्रगती आणि जिनविजयच्या योगदानाची माहिती दिली. वीर सेवा दल व वीराचार्यांचे योगदान.. सभेनं लठ्ठे एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.. वसतिगृहातून जैन शेतकऱ्यांची पोरं शिकवली म्हणून दारात गाड्या आल्या.. बँकेत एफ.डी.वाढली.. टुमदार बंगले निर्माण झाले.समाजातील अनिष्ट रूढी परंपरा नष्ट झाले.सभेमुळे जैन समाज समृध्द झाला. सविस्तर समाजविकास कसा झाला हे सांगितले व अशा आपल्या सभेच्या अधिवेशनाला आलंच पाहिजे.. भरीव मदत केलीच पाहिजे हे हक्काने सांगताच अंकलीकर भारावून गेले. रौप्य मुद्रेचे महत्त्व सांगितले. सभेचे सभासद व्हा व प्रगती घरात आलेच पाहिजे हे आग्रहाने सांगितले.माजी महिला महामंत्री श्रीमती अनुपमा मुळे यांनी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले व निमंत्रण दिले त्यांचे बरोबर पुष्पा गाडवे व सुरेखा मुंजाप्पा उपस्थित होत्या. 

यावेळी प्रा. स्वाती पाटील यांचा सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्यांनी सभेला सहकार्य करण्याचे आश्वस्त केले. त्यांचे पुत्र श्रीवर्धन यांने सभेवर छान भाषण करुन पालकांनी खाऊसाठी दिलेले एक हजार साठवले होते ते सभेला देणगी म्हणून दिली. यावेळी वृषभ खवाटे, विमल पाटील, कामगोंडा पाटील, प्रा. प्रशांत पाटील व अनेक दानशूर व्यक्तींनी सभेला देणग्या जाहिर केल्या. काही रक्कमा जागेवर श्रेणिक पाटील यांचेकडे जमा झाल्या. तसेच मोठय़ा प्रमाणात रौप्यमुद्रा घेण्याचे मान्य करुन सभेचे सभासद व प्रगतीचे वर्गणीदार होण्याची तयारी दाखवली.  आता प्रा. महावीर पाटील, मा. श्रेणिक पाटील व प्रा. प्रशांत पाटील ही सर्व कामे पूर्ण करण्यासाठी व अधिवेशनात सर्व अंकलीकर जैन समाजाची शंभर टक्के उपस्थिती ठेवण्यास सज्ज झाले आहेत. या सर्व कामकाजात समाजभूषण शशिकांत पाटील यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन लाभत आहे. माझी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी शिक्षक सेल कार्याध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल अंकलीकरांनी माजी सरपंच नेमगोंडा पाटील यांच्या हस्ते माझा सत्कार केला. डॉ. चोपडे व दिलीप वग्याणी यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी श्रावक - श्राविका युवा वर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित होता. आभार प्रा. प्रशांत पाटील यांनी मानले. णमोकार मंत्राने संवाद बैठक समाप्त झाली. या संवाद बैठकीसाठी सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील साहेब व चेअरमन रावसाहेब पाटील अण्णा व मुख्यमहामंत्री डॉ. अजित पाटील यांनी आम्हाला प्रोत्साहित केले होते. 

प्रा. एन.डी.बिरनाळे 

सेक्रेटरी 

दक्षिण भारत जैन सभेचे शंभरावे अधिवेशन सांगली 

चलो सांगली.. चलो सांगली १४ व १५ मे २०२२  ला चलो सांगली 

यावेळी मंदीर ट्रस्टी राजगोंडा पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद खवाटे, विनय खवाटे, कामगोंडा पाटील, प्रा. कोटलगी, राणी भरत पाटील, सुनील पाटील, डी. बी. पाटील श्रेनिक पाटील
सोबत बिरनाले सर डॉक्टर अन्नासाहेबचोपडे दिलीप वग्यानी व इतर


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.