त्या सदुनिवर कारवाईसाठी उपमुख्यमंत्र्यांना निवेदन लवकरच मोठ्या कारवाईची शक्यता, उत्पादन शुल्कमध्ये खळबळ
सांगली : इस्लामपूर येथील गोवा बनावट दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या त्या सदुनिच्या कारनाम्यांबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना नुकतेच निवेदन देण्यात आले आहे. मिरजेतील माहिती अधिकार कायर्कतेर् प्रभात हेटकाळे यांनी सांगली दपर्णमधील बातम्यांची कात्रणे जोडून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे त्या सदुनिवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. अजितदादांनी या प्रकरणाची दखल घेत चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे अधिकृतरित्या समजते.
इस्लामपूर येथे गेल्या महिन्यात गोवा बनावटीच्या दारूचा कंटेनर पकडण्यात आला होता. इस्लामपूर येथील एक्साईजच्या एका सदुनिने येलूरच्या बार चालकाला हाताशी धरून एका संशयिताला गोव्याहून दारू आणण्यास भाग पाडले होते. दारू भरलेला कंटेनर येलूर फाट्यावर आल्यानंतर त्या सदुनिने खासगी गाडीवर अंबर दिवा लावून सिंघम स्टाईल एंट्री मारली. नंतर त्या संशयिताकडे प्रकरण मिटवण्यासाठी पैशांची मागणी केली. ती पूणर् न झाल्याने त्या संशयितावर गुन्हा दाखल केला. त्याची चारचाकी गाडीही जप्त करण्यात आली. हे प्रकरण अंगलट येत असल्याचे पाहून त्याने सांगली दपर्णवर तसेच संबंधित संशयितावर दबाव टाकण्याचाही प्रयत्न केला. मात्र तो फोल ठरला. एक्साईजच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्याच्याकडून खुलासाही घेण्यात आलेला आहे. मात्र या प्रकरणाचा अहवाल सांगलीतील अधिकाऱ्यांनी अद्याप वरीष्ठांकडे सादर न केल्याने आश्चयर् व्यक्त केले जात आहे.
दरम्यान हेटकाळे यांनी दिलेल्या निवेदनाची उपमुख्यमंत्र्यांनी दखल घेतली असून काही दिवसातच त्या सदुनिवर कडक कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.