Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

साहित्यरत्न, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी शासनाने ५० लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे.

साहित्यरत्न, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी शासनाने ५० लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. 


सांगली दि.५: साहित्यरत्न, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी शासनाने ५० लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. आण्णाभाऊंचे स्मारक, अभ्यासिका व प्रशिक्षण केंद्रांचा यामध्ये समावेश आहे. सांगली शहरात महालिकेचे अनेक खुले भूखंड आहेत. यावर तातडीने आण्णाभाऊंचे स्मारक उभा करावे, अशी मागणी आण्णा लोकसेवा फाऊंडेशनने केली आहे. फौंडेशनचे अध्यक्ष अशोक मासाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त तसेच समाजकल्यानचे सहाय्यक आयुक्त यांना दिले आहे.

   दरम्याम या बाबत तात्काळ जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभाग प्रमुखांची बैठक घेऊ अशी ग्वाही उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण यांनी दिली असल्याचे मासाळे यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेविका शेवंता वाघमारे, प्रशांत रणधीर, अर्जुन मजले, माणिक गसते, निर्मलाताई जाधव, विजय होळीकट्टी आदी उपस्थित होते. याबाबत बोलताना मासाळे म्हणाले, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मदिनाचे निमित्त साधत शासनाने त्यांचे प्रत्येक जिल्ह्यात स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ५० लाख रुपयांच्या निधीचीही तरतूद केली आहे.

    यामध्ये स्मारक, अभ्यासिका व प्रशिक्षण केंद्रांचा समावेश आहे, असे सांगत मासाळे म्हणाले, सांगली शहरात अण्णाभाऊंचे भव्य स्मारक व्हावे अशी समस्त सांगलीकरांची भावना आहे. महापालिकेचे अनेक भूखंड आहेत. यावर स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. महापालिका आयुक्त तसेच समाजकल्यानचे सहायक आयुक्त यांनाही निवेदन दिले आहे. याशिवाय स्वाक्षरी मोहीमही सुरू करण्यात आली आहे. माजी महापौर कांचन कांबळे, नगरसेविका अप्सरा वायदंडे, स्नेहल सावंत, महेंद्र सावंत, जगन्नाथ ठोकळे, विनायक हेगडे, संजय पवार, विनायक रूपनर आदींनी या मागणीला पाठिंबा दिला आहे, असेही मासाळे यांनी यावेळी बोलताना सांगितले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.