Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मिरजेत क्रिकेट बेटिंगमधून दोन गटात तुफान राडा : घरावर दगडफेक..

 मिरजेत क्रिकेट बेटिंगमधून दोन गटात तुफान राडा : घरावर दगडफेक..


मिरज :  शहरात क्रिकेट बेटिंगमधील पैशाच्या देवाण घेवाणीच्या वादावादीतून दोन गटात तुफान राडा झाला. यातून एकाच्या घरावर दगडफेक करण्यात आली. यावेळी झालेल्या झटापटीत एकाच्या डोक्यात धारधार हत्याराने हल्ला करण्यात आला. शनिवारी रात्री साडेअकरा वाजता ही घटना घडली. पोलिसांनी वेळाच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला.

याप्रकरणी विश्वेश धोंडीराम घोडके याने लायक उर्फ लियाकत जावेद इनामदार याच्यासह क्लब चालक मुजाहीद मुतवल्ली, बापू उर्फ नावीद शरिकमसलत, गोगा उर्फ शाहिद मुल्ला आणि नईम शरिकमसलत (सर्व रा. मुजावर गल्ली, मिरज) या पाच जणांविरुद्ध घरावर दगडफेक, मारहाण आणि मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी तर लायक उर्फ लियाकत जावेद इनामदार याने विश्वेश घोडके याच्यासह अन्य दोघांविरुद्ध फिर्याद दिली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.