Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पत्नी उच्चशिक्षित असेल तर तिला पोटगी द्यावी की नाही? उच्च न्यायालयाने दिला हा महत्त्वाचा निकाल

 पत्नी उच्चशिक्षित असेल तर तिला पोटगी द्यावी की नाही? उच्च न्यायालयाने दिला हा महत्त्वाचा निकाल


देशातील उच्च न्यायालयांसह सर्वोच्च न्यायालयाचे काही निकाल समाजावर मोठ्या प्रमाणात परिणाम करणारे असतात. कौटुंबिक कलह, मालमत्तेची प्रकरणांमध्ये इत्यादी प्रकरणांमध्ये तर न्यायालये समाजाला आरसा दाखवणारे निकाल देतात. असाच एक पती-पत्नीच्या वादावर उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे.

पत्नी उच्चशिक्षित असल्याचा युक्तिवाद करून तिला पोटगी देण्यास नकार दिला जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करत पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने पोटगी देण्याच्या आदेशाला आव्हान देणारी पतीची याचिका फेटाळाली आहे. एका प्रकरणात न्यायालयाने हा निकाल दिला असून, विभक्त होणाऱ्या पती-पत्नींसाठी तो महत्त्वाचा मानला जात आहे.

अंबाला येथील पतीने याचिका दाखल करत उच्च न्यायालयात सांगितले, की त्याचा विवाह २०१६ मध्ये झाला होता. काही काळानंतर याचिकाकर्त्याची पत्नी त्याला कारण न सांगता सोडून निघून गेली. त्यानंतर तिने अंबालाच्या कौटुंबिक न्यायालयात पोटगीसाठी अर्ज दाखल केला.

अंबालाच्या कौटुंबिक न्यायालयाने पत्नीच्या बाजूने निकाल देत पतीला ३६०० रुपये प्रतिमहिना पोटगी देण्याचे आदेश दिले. याचिकाकर्त्याने सांगितले, की तो एका औषधाच्या दुकानात सहाय्यकाचे काम करतो. त्याला ४००० रुपये प्रतिमहिना पगार मिळतो. पत्नीने हिंदीमध्ये एमए केले आहे. तिचे वडील वकिलाकडे क्लर्क म्हणून काम करतात. पोटगी देण्याचा कौटुंबिक न्यायालयाचा आदेश योग्य नसून, तो फेटाळावा अशी मागणी पतीने केली.

उच्च न्यायालयाने मात्र पतीची याचिका फेटाळून लावली. उच्च न्यायालय म्हणाले, की पतीने पत्नी आणि मुलांची देखरेख ठेवावी, ही कायदेशीर आणि नैतिकरित्या त्याची जबाबदारी आहे. पत्नी उच्चशिक्षित आहे म्हणून तिला पोटगी देण्यास नकार दिला जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने पतीला सुनावले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.