Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली काँग्रेसचे कर्मवीरांना अभिवादन..

 सांगली काँग्रेसचे कर्मवीरांना अभिवादन..


सांगली दि.९ : सांगली जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील बाबांच्या मार्गदर्शनाखाली आज काँग्रेस भवनात आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. एन. डी. बिरनाळे व शमशाद नायकवडी यांच्या हस्ते कर्मवीरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. प्रा. एन.डी.बिरनाळे म्हणाले, "कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण केला. 

बहुजन समाजातील गोरगरीब बारा बलुतेदार अठरा पगड जातींच्या मुलांना शिक्षणाची कवाडे खुली करुन त्यांनी महाराष्ट्र मजबूत केला. कमवा शिका योजनेतून स्वाभिमानी व स्वावलंबी पिढ्या घडविल्या. छ. शिवाजी महाराजांच्या रयत कल्याणाचे काम पुढे नेताना फुले दांपत्याचा शैक्षणिक कार्य वारसा नेटाने पुढे नेला. सांगली जिल्ह्य़ात वसंतदादा पाटील,गुलाबराव पाटील व पतंगराव कदम यांनी कर्मवीरांच्या कामाचा वारसा जपला आहे. "

यावेळी बाबगोंडा पाटील, अशोक वारे, एसटी इंटक अध्यक्ष डीपी बनसोडे, सुभाष पट्टणशेट्टी, विठ्ठलराव काळे, शमशाद व जन्नत नायकवडी व कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. आभार विठ्ठल कोळी यांनी मानले. कार्यक्रम आयोजनात अजित ढोले व देशभूषण पाटील यांनी सहकार्य केले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.