सांगलीत ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस "स्वाभिमान दिन" म्हणून विविध उपक्रमांनी साजरा...
सांगली : वंचित बहुजन आघाडी आणि अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघ सांगली जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय अध्यक्ष आद.ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले.
वंचित बहुजन आघाडी व अखिल महाराष्ट्र कामगार - कर्मचारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १० मे हा ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस "स्वाभिमान दिन" म्हणून संपूर्ण महाराष्ट्र भर साजरा केला जातो. यावेळी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. यावर्षी सांगली मध्ये,वंचित बहुजन आघाडी (विश्वशांती बुद्ध विहार) फुले शाहू आंबेडकर मार्ग,श्रमिक नगर येते, सकाळी १० ते दुपारी ३ वाजे पर्यंत नेत्र व आरोग्य तपासणी व दु.४ वाजता बांधकाम व नाका कामगारांना मोफत व कायम "मध्यान्ह भोजन" वाटप शुभारंभ करण्यात आले. तसेच श्रमिक कष्टकरी बांधकाम कामगारांच्या मुलांना "वही व पेन" वाटप करण्यात आले. तसेच असंंघटित कामगारांना शासनाच्या विविध योजनेचा माहिती देण्यात आली.यावेळी बांधकाम व नाका कामगारांना कायम "मध्यान्ह भोजन" हे सांगली जिल्हा कामगार साहाय्यक आयुक्त मा.अनिल गुरव साहेब यांच्या सहकार्याने, इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ महाराष्ट्र शासनाचा उपक्रम राबविण्यात आला. तसेच श्रमिक कष्टकरी कामगारांच्या मुलांना "वही व पेन" शैक्षणिक साहित्य वाटप करण्यासाठी, प्रा.रवी ढाले सर,तसेच डॉ.सुधिर कोलप सर आणि इ.महंमदहनीफ मुल्ला सर यांनी पुरवठा केला.तसेच सामाजिक सलोखा व शांतता राहावी या करता सर्व समाजातील लहान मुले मुली यांच्या हस्ते वाढदिवसाचा केक कापून सर्व वंचित घटकांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी समाज प्रबोधन गाण्याचा कार्यक्रम सादर करण्यात आला.
या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश उपाध्यक्ष प्रा.सोमनाथ साळुंखे, प.महाराष्ट्र अध्यक्ष शाकीर तांबोळी, तसेच जिल्हा महासचिव उमरफारुख ककमरी,जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत खरात यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे संयोजक अखिल महाराष्ट्र कामगार - कर्मचारी संघ,सांगली जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, वंचित बहुजन आघाडी सांगली शहर अध्यक्ष शिवाजी उर्फ पवन वाघमारे यांनी केले आहे.यावेळी भारतीय बौद्ध महासभा सांगली जिल्हाध्यक्ष रूपेश तामगावकर सर,सचिव रतन तोडकर, खजिनदार संजय कांबळे,भारतीताई भगत, विशाल कांबळे,हिरामण भगत,अशोक लोढे,अनिल मोरे सर,मिरज तालुकाध्यक्ष संजय कांबळे,नितीन सरोदे,सिध्दार्थ कांबळे, युवराज कांबळे,विक्रांत सादरे,दिक्षितकुमार भगत,विद्याधर बलखंडे,किरण धुळे,रोहन बलखंडे,प्रियका धुळे,ऋषिकेश माने,किशोर आढाव,परसराम कुदळे,वसंत भोसले, अनिल अंकलखोपे, परशराम कांबळे, विशाल धेंडे, संकेत कोलप, अनिल पवार, अशोक लोंढे, प्रमोद मल्लाडे,सुनील कोळेकर आदी उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.