शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी वार्षिक व लेखा परिक्षण अहवाल मुदतीत सादर करावा
सांगली, दि. 2, : सांगली जिल्ह्यातील सर्व शासनमान्य अनुदान प्राप्त सार्वजनिक ग्रंथालयांनी सन २०२१-२२ या आर्थिक वर्षांच्या कामकाजावर आधारीत असलेले वार्षिक अहवाल दि. ३० जून २०२२ पर्यंत आणि सनदी लेखापालांनी केलेले लेखा परिक्षण अहवाल दि. ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सांगली कार्यालयास सादर करावेत. विहित मुदतीत अचूक व परिपूर्ण वार्षिक अहवाल आणि लेखा परिक्षण अहवाल प्राप्त न झाल्यास परिरक्षण अनुदान वितरीत करण्यात येणार नाही याची सर्व जबाबदारी संबंधित ग्रंथालयांची राहील, असे आवाहन प्र. जिल्हा ग्रंथालय अधिकारी आ. मुं. गलांडे यांनी केले आहे
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.