Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना शाळांवरच्या सोलर पॉवरचे ज्ञान

 मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना शाळांवरच्या  सोलर पॉवरचे ज्ञान


सांगली: माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार रेस टू झिरो उपक्रमांतर्ग मनपा शाळा क्रं ४ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जवळ मिरज, मनपा शाळा क्रं ९ भंडारीबाबा दर्गा स्टेशन रोड मिरज, आणि  मनपा शाळा क्रं ११ बुधवार  पेठ मिरज येथे मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना महानगरपालिकेच्या शाळांवरती बसविण्यात आलेल्या सोलर पॉवर प्रोजेक्ट्स बद्दल आणि सौर पॅनल चे कार्य कसे होते तसेच अपारंपरिक ऊर्जा साधनांची माहिती देण्यात आली. या प्रशिक्षणासाठी मनपाचे विद्युत अभियंता अमरसिंह चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षण विभाग सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका यांचे सहकार्य लाभले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.