Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत व्यापार शिरोमणी पुरस्काराच्या रुपाने व्यापार-उद्यम कर्तृत्वांच्या जीवन गौरवसोहळ्याचे आयोजन - सुरेश पाटील

सांगलीत व्यापार शिरोमणी पुरस्काराच्या रुपाने व्यापार-उद्यम कर्तृत्वांच्या जीवन गौरवसोहळ्याचे आयोजन  - सुरेश पाटील


सांगलीत व्यापार शिरोमणी पुरस्काराच्या रुपाने व्यापार-उद्यम कर्तृत्वांच्या जीवन गौरवसोहळ्याचे आयोजन  - सुरेश पाटील सांगलीचे नाव एक कसोटीची - विश्वासाचीव्यापारपेठ म्हणून ज्यांनी आपल्या कुशल पारदर्शक कल्पक व्यापार शैलीमुळे पश्चिममहाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक आणि गोवा पर्यंत दुमत ठेवलं अशासांगलीच्या कर्तृत्ववान अडत व्यापाऱ्यांचा प्रथम जीवन गौरव सोहळा ‘शिरोमणी पुरस्कार’ देऊन करण्यात येणार आहे. दि. सांगली ट्रेडर्स को.ऑप. क्रेडिट सोसायटी सांगली यांच्या वतीने आयोजितया सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री मा.नाम. बाळासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते वमहाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष मा. काकासाहेब कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली ‘व्यापार शिरोमणी’ पुरस्कार जेष्ठ व्यापारी श्री. सनतकुमार आरवाडे, श्री.आण्णासाहेब पाटील, श्री. शामराव आरवाडे यांना तर ‘हळद व्यापार शिरोमणी’ पुरस्कार श्री. बंकटलालजी मालू व ‘मिरची व्यापार शिरोमणी’ पुरस्कार श्री. विरुपाक्ष पट्टणशेट्टी यांना प्रदान करण्यात येणार आहे. शनिवार दि. ०७मे २०२२ रोजी सायं. ४:०० वाजता राजमती भवन नेमिनाथनगरसांगली येथील वातानुकूलित सभागृहात हा सोहळा संपन्न होणार आहे अशी माहिती दि. सांगली ट्रेडर्स को.ऑप.क्रेडिट सोसायटीचे संस्थापक चेअरमन सुरेश पाटील यांनी दिली. याप्रसंगी उपाध्यक्ष जयंतीलाल ओस्तवाल, ऑन. सेक्रेटरी राजेंद्र पाटील,  मॅनेजर पायगोंडा पाटील व संचालक मंडळयावेळी उपस्थित होते.                    

यावेळी सुरेश पाटील म्हणाले, दि. सांगली ट्रेडर्स को.ऑप. क्रेडिट सोसायटीने सामाजिक, सांस्कृतिक, सहकार, उद्योग यासारख्या अनेक क्षेत्रात आपलाठसा उमटविला असून प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय सहकार क्षेत्रातील मानाचा दीपस्तंभपुरस्कार, तसेचबँको पुरस्कार प्राप्त झाला आहे.५१ कोटीच्या ठेवी,  ४१ कोटींचे कर्जवाटप, १५ कोटींची गुंतवणूक, ७ कोटीचा स्वनिधी, स्वमालकीच्या दोन इमारती असून गेल्या २८वर्षांपासून सतत ऑडीट वर्ग ' अ' प्राप्त झाला आहे . १५ टक्के डिव्हीडंट वाटपहोत आहे. या वर्षी प्रथमचपतसंस्थेच्या वतीने सांगली नगरीचे नाव व्यापार-उद्योग क्षेत्रात हळद , गुळ, मिरची, बेदाणे या सारख्यांचा कुशल, पारदर्शक, कल्पकव्यापार शैलीमुळे संपूर्ण राज्यात तसेच देशांमध्ये दुमदुमत ठेवलं अशा सांगलीच्याअडत व्यापाऱ्यांचा ‘प्रथम जीवन गौरव सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. 

 यामध्ये‘अडत व्यापार शिरोमणी’ पुरस्काराने सन्मानित सनतकुमार आरवाडे फेडरेशनऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे सीनियर उपाध्यक्ष, महाराष्ट्रचेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य तसेच सांगली बँकलिमिटेडचे माजी संचालक, रत्नाकर बँक लिमिटेडचे संचालक आहेत.त्यांना 'फाम'चा ‘व्यापररत्न’ आणि ‘व्यापारश्री’ चा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्तझाला आहे. तर अडत व्यापार शिरोमणी पुरस्कार प्राप्त आण्णासाहेब पाटील हे सांगलीचेंबर ऑफ कॉमर्स, तसेच सांगली कृषी उत्पन्न बाजारसमितीचे संचालक होते. त्यांनी तरुण भारत व्यायाम मंडळसांगलीचे ४५ वर्ष संचालक म्हणून कार्य केले आहे. त्यामध्ये २५ वर्षे सेक्रेटरी म्हणून कार्यरत राहिले आहेत. १९६० पासूनअडत दुकान व्यवसायास यांनी सुरुवात केली.तसेच ‘हळद व्यापार शिरोमणी’ पुरस्कार प्राप्त शामराव आरवाडे हे लायन्सक्लबचे संस्थापक अध्यक्ष, सांगली चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक तसेचबाजार समितीचे प्रतिनिधी असून १९८०ते  १९८५ अशी पाच वर्षे ते समितीचे उपाध्यक्ष होते. त्यांनी शिरगावकर रक्तपेढीला प्रथम उपचारचाचणी मशीन दान केली आहे. तसेच ‘हळद व्यापार शिरोमणी’पुरस्कार प्राप्त बंकटलालजी  मालू हे जनतासहकारी बँकेचे संचालक महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरीचे महासभा संचालक आहेत. १९६० मध्ये ते हळदीच्या कौटुंबिक व्यवसायात सामील झाले. तसेच ‘मिरचीव्यापार शिरोमणी’ पुरस्कार प्राप्त विरुपाक्षपट्टणशेट्टी यांनी १९६० सालीहमाली करण्यासाठी ते सांगलीत  मार्केट यार्ड  येथे आले. १९६० ते १९८० पर्यंतत्यांनी हमाली केली. १९७० लापट्टणशेट्टी व मिक्कल &कंपनीची सुरुवात केली. गेल्या ५० वर्षापासून मिरचीचा खरेदी-विक्रीचा व्यापार तेकरीत आहेत. २००७ साली त्यांनी अक्षय इंडस्ट्रीज एमआयडीसी मिरजयेथे व्यवसाय सुरू केला. शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात अनेकदा दानधर्म केले आहे.


यावेळी सुरेश पाटील म्हणाले या जीवन गौरवसोहळ्याच्या औचित्याने उपस्थितमान्यवरांच्या उपस्थितीत व शुभहस्ते , दि. सांगली ट्रेडर्स को.ऑप.क्रेडिट सोसायटीच्या वतीने ग्राहकांना देण्यात येणाऱ्या नवीन डिजिटल बँकिंगप्रणाली सुविधांचा उदघाटन सोहळासंपन्न होणार आहे. तसेच क्यूआर कोड सर्व्हिस, एनईएफटी/आरटीजीएससर्व्हिस, मोबाईल बँकिंग सर्व्हिस, ज्येष्ठ नागरिकांसाठी एटीएम तुमच्या दारी, मोबाईल पिग्मी कलेक्शन या सेवा सुविधांचाशुभारंभ केला जाणार आहे. तरी सर्वांनी या गौरव सोहळ्यासउपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.