काँग्रेसने महाराष्ट्र मोठा केला - पृथ्वीराज (बाबा) पाटील
सांगली दि.१: महाराष्ट्राचा मंगल कलश स्व.यशवंतराव चव्हाण यांनी आणला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक आव्हाने पेलत काँग्रेसने महाराष्ट्राचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कृषी, उद्योग आणि इतर क्षेत्रातील विकास केला आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अनेकांनी बलिदान दिले आहे. त्यांचे कायम स्मरण करु या. भारतीय संविधानातील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी एकत्र काम करु या. घाम गाळणारे श्रमिक व शेतकरी.. शेतमजूर.. महिला यांच्या कल्याणासाठी झटू या असे प्रतिपादन जिल्हा शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केले. ते आज काँग्रेस भवनमध्ये आयोजित महाराष्ट्र दिन, जागतिक कामगार दिन व स्वामी रामानंद भारती यांच्या १२५ व्या जयंती कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी शिक्षक सेल कार्याध्यक्ष प्रा. एन. डी. बिरनाळे होते.
प्रारंभी सकाळी स्टेशन चौकात सेवा दल जिल्हाध्यक्ष अजित ढोले व काँग्रेस भवनासमोर पृथ्वीराज पाटील बाबा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
स्वागत व प्रास्ताविक अजित ढोले यांनी केले. अध्यक्षीय भाषणात प्रा. बिरनाळे यांनी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राच्या विकासातील योगदान सांगून श्रमिकांना.. शेतकरी.. कष्टकरी वर्गाने महाराष्ट्र उभा केला आहे..छ . शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने जाणे.. घाम गाळणाऱ्यांचा सन्मान करणे हीच खरी शुभेच्छा असे प्रतिपादन केले. लोकशाही व स्वातंत्र्य बळकट करण्यासाठी मतदान साक्षरता वाढली पाहिजे असेही ते म्हणाले.
यावेळी काँग्रेस सोशल मीडिया सेलचे अंकुश पाटील यांनी स्वामी रामानंद भारती यांच्या कार्याचा आढावा घेतला.
आभार काँग्रेस लिगल सेलचे भाऊसाहेब पवार वकील यांनी मानले.
यावेळी बाबगोंडा पाटील, अल्लाबक्ष मुल्ला, रामसिंग परदेशी, श्रीधर बारटक्के सौ. सुनिता मदने शमशाद नाईकवाडी, जुबेदा बिजली, फरहान भालदार, सुभाष पट्टणशेट्टी, अरुण पळसुले, विठ्ठलराव काळे, सुरेश गायकवाड, अशोक वारे, विश्वास यादव उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.