Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राष्ट्रीय महामार्ग पेठनाका ते सांगली चौपदरीकरण व सांगली ते मिरज डी पी आर लवकर करावा आमदार सुधीरदादा गाडगीळ

राष्ट्रीय महामार्ग पेठनाका ते सांगली  चौपदरीकरण व सांगली ते मिरज डी पी आर लवकर करावा आमदार सुधीरदादा गाडगीळ 


सांगली मंगळवार ता. ११ :  पेठ नाका- सांगली- मिरज राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ एच या महामार्गावरील पेठ नाका ते सांगलीवाडी टोलनाका या ४१ किमी रस्त्याचे चौपदरीकरण करावे. तसेच सांगलीवाडी ते मिरज या उर्वरित लांबीचे डी.पी.आर पुर्ण करुन रस्त्याचा दर्जा सुधारावा अशी मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना मेल द्वारे व समक्ष मुख्य अभियंता राष्ट्रीय महामार्ग कोकण मुंबई येथील कार्यालयात यांना निवेदन पत्र देऊन मागणी केली आहे.

आमदार सुधीर गाडगीळ यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पेठ नाका- सांगली- मिरज या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ एच हा रस्ता पेठ नाका येथून सांगली शहर व मिरज मार्गे सोलापुरकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग व कर्नाटककडे जाणाऱ्या राज्यमार्गला जोडणारा रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी असते.  या रस्त्यावरील पेठ नाका ते सांगलीवाडी या ४१ किमी लांबीचे कॉक्रीटीकरणाने रस्ता दर्जन्नत करण्याच्या कामाचा डी.पी.आर. प्रगतीपथावर आहे.  सदर रस्त्याचे रहदारीच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने चौपदरी,  दुपदरी असे दर्जोन्नती करणे उचित वाटत नाही. त्यामुळे सदर पेठ नाका ते सांगलीवाड़ी टोलनाका या ४१ किमी रस्त्याचे संपुर्ण लांबी चौपदरीकरण करण्यात यावे.

तसेच पेठ नाका सांगली - मिरज रस्त्याच्या सांगलीवाडी टोल नाका ते मिरज या १४ किमी लांबीचे काम प्रलंबित आहे. हा रस्ता पुणे बेंगलोर महामार्गापासुन सांगली, मिरज शहरातून सोलापूर व कर्नाटककडे जाणा-या रस्त्यांना जोडणारा तसेच सांगली मिरज शहर व एम.आय.डी.सी.साठी अत्यंत महत्वाचा रस्ता आहे. तरी सदर सांगलीवाडी टोल नाका ते मिरज रस्त्याचे डी.पी.आर. पुर्ण करुन प्रधान्याने दर्जेन्नती करण्यात यावे, अशी मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी निवेदनात केली आहे..


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.